कॉलेज विद्यार्थिनीने गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून नदीत उडी मारली,
The college student jumped into the river from the big bridge of Godavari river,
शोध घेण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने नदीत उडी मारलीA police officer jumped into the river to search
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue4 Jan.2022 17.20Pm.
कोपरगाव: मंगळवारी (४) जानेवारी रोजी नगर-मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाच्या कठड्यावरून दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका वीस वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने नदीत उडी घेतली असल्याची घटना घडली असून पोलिस उशिरापर्यंत नदीच्या पाण्यात तिचा शोध घेत होते परंतु मुलीचा तपास लागला नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावर पुलाच्या कठड्यावर उभे राहून कॉलेजच्या वीस वर्षाच्या विद्यार्थिनीने आपल्याजवळील स्कूल बॅग व तोंडाचा मास्क कठडयाखाली खाली काढून ठेवला व गोदावरी नदीत उडी घेतली ही घटना पुलाच्या दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या सर्पमित्र संदीप खरे नावाच्या तरुणाने पाहिली व त्याने तातडीने कोपरगाव शहर पोलिसांना फोन केला. काही मिनिटात कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्या ठिकाणी पाण्यात सर्पमित्र संदीप खरे व पोलीस कर्मचारी यांनी स्वतः कपडे काढून पाण्यात उड्या मारुन तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जवळ असलेल्या मच्छीमारांना बोलावून त्यांच्या मदतीने पाण्यात शोध घेण्यात आला काही वेळातच याठिकाणी कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन पथकही पोचले होते. या सर्वांनी जवळपास ती अडीच ते तीन तास शोध विद्यार्थीनीचा उडी मारलेली ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु पाणी जास्त असल्यामुळे विद्यार्थिनीचा तपास लागू शकला नाही.एव्हाना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.अंधार पडल्यामुळे तपास कार्य थांबविण्यात आले. उडी मारलेली विद्यार्थिनी कोणत्या कॉलेजमध्ये शिकत होती व तिचे नाव काय आहे हे मात्र समजू शकले नाही.