कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ध्येयवादाला सुशिलामाई काळे समर्पित होत्या – डॉ. श्रीपाल सबनीस

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ध्येयवादाला सुशिलामाई काळे समर्पित होत्या – डॉ. श्रीपाल सबनीस

Sushilamai Kale was dedicated to the heroism of Karmaveer Shankarrao Kale – Dr. Shripal Sabnis

कै.सौ.सुशीलाबाई (माई) काळे भव्य आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धाLate Mrs. Sushilabai (Mai) Kale Grand Intercollegiate State Level Eloquence Competition

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue4 Jan.2022 17.30Pm.

कोपरगाव: कर्मवीर भाऊराव पाटील यांची आदर्श विचारसूत्रे समाजमनात रुजवण्याचे महान कार्य आपल्या निखळ दृष्टीतून व शुद्ध जगणे व ध्येयवादातून कर्मवीर शंकरराव काळे यांनी केले . या त्यांच्या ध्येयवादाला माई समर्पित होत्या . माईंच्या जीवनाचं मूल्य समर्पणात असून त्यांचे व्यक्तिमत्व आधुनिक काळातील स्त्रियांसाठी आदर्श आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. अध्यक्षस्थानी रयत उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे हे होते.

श्री सदगुरु गंगागीर महाराज कॉलेज मध्ये कै.सौ.सुशीलाबाई (माई) काळे यांचे स्मृती-प्रीत्यर्थ दोन दिवसीय भव्य आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी केले.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, डोळसपणे सुरु केलेला वक्तृत्व स्पर्धेचा हा उपक्रम गेली २० वर्ष सुरु असून हा सन्मान केवळ माईंचा नाही तर हा एका कर्तबगार स्त्रीत्वाचा, तिच्या उत्कर्षाचा सन्मान आहे. एक कर्तबगार स्त्रीत्व या स्पर्धेच्या निमिताने सन्मानित होत आहे ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे. प्रसिध्द उद्योगपती सुनील जगताप, सौ. ललिता सबनीस, कॉलेज समिती सदस्य सुनील गंगुले, दिलीप उपस्थित होते.

आ. आशुतोष काळे म्हणाले की, माईंच्या स्मृती आजही जागृत असून त्यांचा जीवन प्रवास सर्व सामान्यांचे आयुष्य समृद्ध करणारा आहे. माईच्या नावाने होत असलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमिताने होणारे वैचारिक मंथन महत्वाचे आहे.

याप्रंगी सुनील जगताप यांनीही माईंच्या स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी परीक्षक डॉ. धनंजय भिसे, डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. निवृत्ती मिसाळ, उपप्राचार्य. डॉ. सुभाष रणधीर, डॉ.व्ही.बी. निकम,प्रा. रामभाऊ गमे, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.छाया शिंदे यांनी केले. तर आभार डॉ.सुरेश काळे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page