संजीवनी हे ग्रामीण भागातील तीनही इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस असलेले एकमेव कॉलेज राहील – अमित कोल्हे
Sanjeevani will be the only college with autonomous three institutes in rural areas – Amit Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 8Jan.2022 13.00Pm.
कोपरगाव: आज संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,व संजीवनी कॉलेज ऑफ फार्मसी, ऑटोनॉमस झाले आहेत. पुढच्या महिन्यात निकाल आला तर संजीवनी कॉलेज ऑफ के.बी.पॉलीटेक्निक हेही ऑटोनॉमस होईल.तेंव्हा आपण महाराष्ट्रात ज्यावेळेस बघू त्यावेळेस ग्रामीण भागातल्या एकमेव कॉलेज असं राहील ते तिथे तीनही इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस होईल हे महाराष्ट्रातील पहिलं राहिलं ते म्हणजे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट !असा गौरवयुक्त ठाम आत्मविश्वास संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला.
अमित कोल्हे म्हणाले, यावर्षी दोन महत्त्वाच्या अचीवमेंट झाल्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या त्यात म्हणजे आपले संजीवनी फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च हे ऑटोनॉमस झालं ते भारतातले नववे कॉलेज आहे. आणि महाराष्ट्रातले पहिलं प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज झाल आहे. फार्मसी मध्ये जवळ जवळ चार हजार कॉलेजेस आहेत. यामध्ये फक्त नऊ कॉलेजेस आहेत त्यात नववे म्हणजे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मसीटी तसेच जस्ट मागच्या पंधरा दिवसापूर्वी पॉलिटेक्निकची जी ऑटोनॉमस कमिटी आली आहे तिला ही सामोरं गेलो आहे. माझ्या मते येणाऱ्या दहा पंधरा दिवसात त्याचाही निकाल येईल. अमित कोल्हे म्हणाले, हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच आदरणीय शंकरराव कोल्हे साहेब असतील आदरणीय नितीन दादा असतील आदरणीय बिपिन दादा असतील यांचा एक दृष्टिकोन आहे कि, विद्यार्थ्याला प्लेसमेंट करणे त्याला जर पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर कसे मार्गदर्शन करू शकतो आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःचा उद्योग धंदा कसा चालू करू शकतो या तीन गोष्टीवरच संजीवनी उद्योग तसंच संजिवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ची स्थापना त्या अनुषंगाने झालेली आहे. आपल्याला इंडस्ट्रीजला काय लागते हे आपण मुलांना दिलं पाहिजे आणि त्याला आमचे सर्व प्राचार्य आमचे सर्व विभाग प्रमुख यांनी हातभार लावला म्हणून सर्व गोष्टी होतात.
अमित कोल्हे म्हणाले, आज सांगायला आनंद वाटतो की, एवढा कोरोनाचा काळ असतानाही शंकरराव कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या सर्व संस्थेचे विविध प्राचार्य यांच्या प्रयत्नाने संजिवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ने यावर्षी बाराशे प्लस प्लेसमेंट मुलांना दिल्या आणि याच्यात हायस्ट पॅकेज बारा लाखांचे होते. इंजिनिअरिंग मध्ये ५५० मुलांना आम्ही प्लेसमेंट दिली, तर पॉलिटेक्निक मध्ये ३२० पेक्षा जास्त मुलांचे प्लेसमेंट झाले. हे सांगायचे यासाठी कि, उद्देश एवढाच आहे. हे सर्व विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातील आहेत. आणि एवढा कॉन्फिडन्स माझ्यात आलेला आहे की, आपण जर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर तो निश्चितच योग्य अंतरावर जाउन त्याला जॉब मिळू शकतात. आपण बघत आलो आहे या अशा या काळात नोकरीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात. या सर्वांना अनुसरून नितीन कोल्हे आणि बिपिन कोल्हे यांनी फॉरेनर लैंग्वेज चालू केली संस्थेमध्ये आज जापनीज आणि जर्मन या लैंग्वेज चालू केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी एक संपूर्ण जवळ जवळ पंधरा जणांची प्लेसमेंट टीम उभारली आहे. आणि या सर्व जणांचा एक दृष्टिकोन असतो की मुलांना प्लेसमेंट च्या दृष्टीने तयार करायचे तसेच बिपिन कोल्हेंच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन विद्यापीठांशी करार केलेला आहे इजराइल इंडियाचे शंकर कॉलेज आणि रशियाच्या उर्फ युनिव्हर्सिटी यांच्याशी आपण करार केलेला आहे.
अमित कोल्हे पुढे म्हणाले मागील कोरोना च्या काळात आपल्या दीडशे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उर्फ युनिव्हर्सिटी बरोबर इंटर्नशिप केली आणि त्यांना त्या इंटरंशिप मध्ये रशियाबरोबर जर्मनचे ही प्रोफेसर शिकवायला होते. या सर्व गोष्टी ज्या वेळेस चालू होत्या त्याच वेळेस एक अडचणीची महत्त्वाची गोष्ट होती की, विद्यार्थी कॉलेजमध्ये नव्हते. आणि त्यांना शिकवायचे कसे हा एक फार मोठे आवाहन ( चायलेंज) होते. त्याला अनुसरून सर्व आदरणीय संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे बोर्ड मेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक स्वतःची (एल. एम. एस.) लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम डेव्हलप केली की ज्या थ्रू आम्ही केजी टू पीजी सर्व स्टूडेंटला त्या प्लॅटफॉर्म थ्रू ऑनलाइन शिक्षण दिले. हे सर्व होत असताना ही ही जबाबदारी होती. मुले फक्त एज्युकेशन घेताना त्यांना फक्त थेरॉटीकल नॉलेज नको तर त्यांचे प्रॅक्टिकल नॉलेज झाले पाहिजे वेळोवेळी त्यांचे क्विज घ्यायचे त्यांचा ऑनलाईन टेस्ट घ्यायच्या त्यांना प्रोजेक्ट द्यायचे हे काम सर्व आमच्या इन्स्टिट्यूटमधून झाले हे सर्व होत असताना आपण एका लेवल पासून दुसऱ्या लेव्हल कडे चाललो आहोत आणि त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या दोन वर्षात दिसतील जे आपण म्हणत आहोत मी जे आपल्याला सांगितलं. आमचा हायेस्ट पॅकेज बारा लाखापर्यंत होता पुढच्या वर्षी आमची इंजिनिअरिंग कॉलेज ची पहिली बॅच बाहेर पडेल आणि आत्तापासूनच दादा आणि साहेबांचे आमच्यावर प्रेशर आहे की ४० लाखांचा पॅकेज आपल्याला कसा देता येईल या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा बिपीनदादा आहेत आणि मीच सांगतो की पुढच्या वर्षी ज्या वेळेस आपली ऑटोनॉमसची मुले बाहेर पडतील निश्चितच आपल्याला वीस ते तीस मुले चाळीस लाखाच्या पॅकेजमध्ये दिसतील.अशी मी ग्वाही देतो कारण की त्या दृष्टीने आमची सर्वांची तयारी चालू आहे आणि जशी हे ४० लाखांचे पॅकेज मिळणार आहे ते सर्व विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातील राहणार आहेत फक्त त्यांचं पोटेन्शियल बघणे गरजेचे आहे ज्याला अनुसरून आम्ही सर्व जण काम करत आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले.