राष्ट्रगौरव आचार्य १०८ श्री वर्धमानसागर महाराज यांचे सह ३० जैन साधू व साध्वी यांचे कोपरगावात आगमन
Arrival of 30 Jain Sadhus and Sadhvis in Kopargaon with Rashtragaurav Acharya 108 Shri Vardhamansagar Maharaj
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 8Jan.2022 18.40Pm.
कोपरगाव : दिगंबर आगमनाच्या २० व्या शतकातील चरित्र चक्रवर्ती प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या परंपरेचे पंचम पट्टाचार्य वात्सल्यवारीधी जिनधर्म प्रभावक राष्ट्रगौरव आचार्य १०८ श्री वर्धमानसागरजी महाराज यांचे सह ३० साधू व साध्वी यांचे आज ज्ञान तीर्थ (सावळीविहिर)येथून कोपरगाव शहरात सनई चौघडाच्या निनादात बँड बाजा लावून सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गोदावरीच्या लहान पुलावर भव्य स्वागत करण्यात आले.त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र सडा रांगोळ्या फुलांची उधळण करण्यात आली
तालुक्याच्या वतीने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिरचे प्रमुख विश्वस्थ प पू रमेशगिरी महाराज, आमदार आशुतोष काळे, भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने आदींनी आशीर्वाद घेतले.
कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात इतक्या मोठया संख्येने आचार्य वर्धमानसागरजी महाराज यांचे साधू साध्वी सह आगमन झाले आहे. आचार्य श्री वर्धमान सागर महाराज हे १० ऑक्टोबर २१ रोजी कर्नाटक राज्यातील कोथळी येथून चातुर्मास करून राजस्थान येथील महावीरजी अतिक्षय क्षेत्र येथे बाहुबली म्हामस्तंभिषेक करण्यासाठी १५०० की. मी. चे अंतर पायी चालून (दहा की. मी. रोज )पदभ्रमण करत आहे. त्यांच्या समवेत १०० भाविक भक्तांचा लवाजमा आहे अशी माहिती संघाच्या जाहिरात प्रमुख पूनम दीदी यांनी सांगितले.
वर्धमान सागर महाराजांची दररोज प्रतकळी ३ वाजता उठून परिभ्रमण करून स्वाध्याय घेणे ,सामायिक वंदना धार्मिक विधी करून आलेल्या भविकांसाठी सत्संग प्रवचन करणे व मौन धारण करणे अशी दिनचर्या आहे. पूजा पाठविल्यानंतर आचार्य वर्धमान सागर यांनी उपस्थित भाविक पण समोर प्रवचन दिले. येथील महात्मा गांधी चॅरिटेबल मध्ये त्यांचा मुककम असून सकल दिगंबर जैन समाजाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
चौकट–
दोन संतांची चर्चा- सकाळी आगमन झाल्यानंतर आचार्य वर्धमान सागरजी महाराज व रमेशगिरीजी महाराज यांच्यात बाजूला जाऊन चर्चा झाली.