सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालकाकडून ऊस तोडणी  प्लॉटची पहाणी

सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालकाकडून ऊस तोडणी  प्लॉटची पहाणी

Inspection of sugarcane harvesting plot by the Executive Director of Sahakar Maharshi Kolhe Factory

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 9Jan.2022 18.00Pm.

कोपरगाव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी अचानक कार्यक्षेत्रातील देर्डे-कोऱ्हाळे, कुंभारी, वेळापूर गटात भेटी देवून प्रत्यक्ष उस तोडणी प्लॉटची पहाणी करून कारखान्याने ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी व वहातूक होते की नाही याची पहाणी केली.

  यावेळी त्यांनी प्रत्यक्ष्य ऊस तोडणी मजूरांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. त्याच बरोबर ऊसाची जमिनीलगत तोडणी वाढे छाटणी होते की नाही व करोना संदर्भात लसीकरणाची स्थिती जाणून घेतली तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, विद्यमान अध्यक्ष  बिपीन कोल्हे,  उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक,  कारखान्याचे तज्ञसंचालक विवेक कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव  कोल्हे, स्नेहलता कोल्हे यांनी ठरवून दिलेल्या धोरणानुसार सभासद बंधू भगिनींचे ऊस तोडणी प्रोग्राम धोरणानुसार चालू आहे की नाही, तसेच साखर आयुक्त  यांचे आदेशानुसार व परीपत्रकानुसार सर्व सूचनांचे पालन होते की नाही याची खात्री केली.          

यावेळी ऊस तोडणी मजुरांचे आरोग्य, त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांची खात्री प्रत्यक्ष शेतावर व मजूरांचे कोपीवर जाऊन केली. सर्वच बाबतीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अशा ध्येयधोरणाची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याबाबतची प्रत्यक्ष खात्री करून समाधान व्यक्त केले. करोना काळात सोशल-डिस्टसींग मास्कचा वापर, वारवार हाथ धूणे व सॅनीटायझर वापरा संबंधी सूचना व मार्गदर्शन केले. कारखाना धोरणानुसार यापुढेही स्वच्छ ताजा, पाचट विरहीत ऊस गाळपासाठी पुरवठा करणेसंदर्भात सुचना संबंधीत मजूर, कर्मचारी यांना दिल्या.         

याप्रसंगी शेतकी ओव्हरसियर एस. ए. मुजगूले व संबंधीत कर्मचारी उपस्थीत होते व प्रगतीशिल शेतकरी राजेंद्र देवराम गवळी, अजित बाबूराव नवले, विश्वनाथ घोंडीबा होन, रावसाहेब होन, मच्छिंद्र आनंदा गवळी, बाबासाहेब देवराम गवळी यांचे क्षेत्राची पहाणी केली, यावेळी कारखाना व्यवस्थापनाचे धोरणानुसार को. ८६०३२ ची लागवड केली असून प्रत्यक्ष उत्पन्न एकरी ६५ मे.टन मिळाले असून समाधानी असलेचे मत  राजेंद्र गवळी यांनी व्यक्त केले.         

 यावर्षी को ११०१५ व व्ही. एस. आय. १८१२१ या वानांची लागवड केली असे सांगीतले. बुडखे छाटणी, पाचटाचा आच्छादन म्हणून वापर व संजीवनी ऑरगॅनिक मॅन्युअरमुळे निडवा, चिकातही फायदा झाला, उसाची लागवड, बेणे व रासायनिक खतामध्ये बचत होवून अजित नवले यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page