आम्ही पत्रकारितेच्या कंगाल दिनात आहोत- आशिषजाधव
We are in the poor days of journalism – Ashish Jadhav
औचित्य पत्रकार सन्मान सोहळा Justification Journalist Honor Ceremony
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 9Jan.2022 18.20Pm.
कोपरगाव: आम्ही पत्रकारितेच्या कंगाल दिनात आहोत कधी नव्हती एवढी कंगाली या पत्रकारिता क्षेत्रात आली आहे.टिव्ही चैनल असो की वर्तमानपत्रे लोकांच्या अभिरुचीचा कोणीही विचार करत नाही. लोकांना वाचकांना काय हवे याचा विचार नाही म्हणून हा कंगाली चा दौरा आहे आता आम्हीच देतो ते तुम्हाला बघावं लागेल वाचावं लागेल कारण तुम्हाला पर्याय नाही हाच वाईट काळ आहे. असे परखड मत ज्येष्ठ संपादक आशिष जाधव यांनी कर्मवीर शंकरराव काळे कार्यस्थळावर रविवारी पत्रकार समान सोहळा कार्यक्रमात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी साई संस्थान अध्यक्ष आमदार आशुतोष काळे हे होते.
पाहुणे म्हणून संतोष मंडवे व आदित्य जाधव उपस्थित होते प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक पद्माकांत कुदळे यांनी केले.
अशिष जाधव म्हणाले,बातमी ही पाहिजे कि, लोकांचा यात किती सहभाग आहे. लोकांसाठी महत्त्वाची आहे , लोकांनी ती बातमी वाचल्यानंतर लोकांना काय मिळणार आहे. याचा विचार बातमीदाराने करावा असा हा आत्ताचा काळ नाही. आहे कारण तो रियल न्यूज देऊ शकत नाही. हा बातम्यांचा खेळखंडोबा झाला आहे. टिव्ही चैनल ला बातम्यांचा रियालिटी शो झाला आहे.पत्रकार बनने सोपे आहे. पण बातमीदार बनणे फार कठीण आहे. बातमी तुम्ही लिहिताना त्या बातमीत आपण काय लिहितो, लोकांची बातमी लोकांच्या हितासाठी जनतेसाठी ती बातमी लिहिली पाहिजे, ज्याविषयी आम्हाला प्रस्थापितांना प्रश्न विचारायचे आहे आता मी जे घडलं ते दाखवतो.सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी काय भूमिका मांडतात यावरती तुमचे मोजमाप असते पेपर लहान की मोठा वाचक जास्त की कमी हे महत्त्वाचे नाही तर तुमची बातमी किती परिणाम कारक आहे तुमची भूमिका किती ठोस आहे हे बघितले जाते पत्रकारांनी सजगपणे हा विचार केला पाहिजे आपली पत्रकारिता पुढे न्यायची असेल आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव लावत असू तर मग पत्रकार म्हणून आपल्याला बातमीदार व्हायचं का पत्रकार पत्रकार म्हणून आपल्याला बातमीदारी चांगल्या पद्धतीने करायचे असल्यास बातम्या ची निवड कशी केली पाहिजे लोकांचे प्रश्न केले पाहिजे मराठी पत्रकारितेमध्ये आपण लोकांचे म्हणणे मांडत नाही इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लोकांचे कोट केले जातात. असे त्यांनी सांगीतले.
अशिष जाधव म्हणाले,अपघाताने जे पत्रकार बनतात तेच चांगले पत्रकार होतात. ग्रामीण भागात पत्रकारिता करण्याला खूप स्कोप आहे मला भूमिका घ्यायला अडचण असेल तर ती लोकांच्या तोंडून ती मांडू शकतो लोकांचा सहभाग जर आपण बातमीदारीत वाढवला तर या कंगालीच्या पत्रकारितेतून बाहेर पडता येईल. लोकांच्या माध्यमातून ते तुम्ही मांडा ते जर तुम्ही केलं तर पत्रकारितेला अजून उज्वल भवितव्य आहे जरी मी हा कंगाली काळ आहे असे म्हटले हा दौर ही जाईल पुन्हा सुगीचा काळ येईल जिथे खरी बातमी येईल हीच खर्या अर्थानं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना श्रद्धांजली असेल.

अध्यक्षपदावरून बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले, सर्वच प्रकारचा मिडीया हा महत्त्वाचा आहे आणि आपल्या सर्वांच समाजामध्ये एक वेगळे स्थान आहे आपण जे काही दाखवतो किंवा लिहितो त्यामुळे समाजाचे मत बनवत असतो मी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना करत असलेले प्रयत्न करत असलेला निधी हे आपल्या माध्यमातून समाजापर्यंत जाण्याचे काम होत आहे समाजामध्ये चांगल्या प्रकारची इमेज सर्वजण माझी तयार करण्याची भूमिका बजावत आहेत आणि आपण असेच कर्मवीर शंकरराव काळे असतील माजी आमदार अशोक काळे असतील यांच्यापासून आपले सर्व पत्रकारांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत ते पुढच्या काळात माझ्याबरोबर आमच्या कुटुंबाबरोबर उद्योग समुहा बरोबर ठेवावे व आपले सर्वांचे सहकार्य असेच लाभावे. शेवटी आभार कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी केले.





