कोरोनाची तिसरी लाट; सोमवारी आ. काळे यांची टाक्स फोर्स बरोबर आढावा बैठक

कोरोनाची तिसरी लाट; सोमवारी आ. काळे यांची टाक्स फोर्स बरोबर आढावा बैठक

The third wave of the corona; Come monday Kale’s review meeting with the tax force

गर्दी कमी करा – आ. आशुतोष काळे Reduce the crowd – come on. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 10Jan.2022 17.00Pm.

कोपरगाव: सरकारने तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे त्याचप्रमाणे विवाह, साखरपुडा, अंत्यविधी या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे पॉझिटिव्ह पेशंटची संख्या वाढत आहे. तेंव्हा यासाठी आयोजकांनी कमी लोकांना बोलवावे, जेणेकरून गर्दी कमी होईल असे आवाहन साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी सोमवारी (१०) रोजी कोरोना तिसरी लाट संबंधित शासकीय अधिकारी टास्क फोर्स च्या आढावा बैठकीत केले. या बैठकीत आ. काळे यांनी सद्यस्थितीचा व संभवीत तिसऱ्या लाटे संबंधित काय तयारी केली आहे याचा आढावा घेतला.

आ. काळे म्हणाले, अनेक ठिकाणी पेशंट निघत आहे. विशेषता लग्न, साखरपुडा, अंत्यविधी या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणची गर्दी कशी कमी करता येईल यासाठी लोकांनी प्रयत्न करावे, तसेच लसीकरण केलेल्या नागरिकांनी लसीकरण केल्याची ऑनलाईन नोंदणी करावी जेणेकरून रेकॉर्डला तुमचे नाव येईल ते न केल्यामुळे आज रेकॉर्डला लसीकरणाची टक्केवारी कमी दिसत आहे.

यावेळी बोलताना तहसीलदार विजय बोरूडे म्हणाले, नाईट कर्फ्यू मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर दिसून येत आहे या वाळू तस्करांमुळे सामाजिक समस्या निर्माण होत आहे. मला दहा वेळा सर्व सोडून त्यांच्या मागे पळावे लागते ७९ गावातील लोकांचे प्रश्न निर्माण होतात वाळू तस्करांमुळे आम्हाला सर्व सोडावे लागते, यापुढे मी नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच त्यासाठी गावकऱ्यांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित आहे. असेही ते म्हणाले,

यावेळी डॉ.कृष्णा फुलसौंदर म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी आपली पूर्ण तयारी झाली असून ग्रामीण रुग्णालयात १८० ऑक्सीजन बेड, तर खासगी ठिकाणी २४० व कोवीड सेंटरला ५०० बेड तयार आहेत. तसेच आपला हवेतून ऑक्सिजन हा प्लांट सुरू आहे. ऑक्सिजन पण भरपूर प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना थोडीफार लक्षणे दिसत असतील त्यांनी जमेल त्या ठिकाणी ताबडतोब तपासणी करून घ्यावी, होमक्वॉरंटाईन रुग्णांनी सात दिवस घरात राहणे गरजेचे आहे.त्या रुग्णांनी स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन त्यांनी केले. अन्यथा “येरे माझ्या मागल्या” प्रमाणे पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणे कोरोना पसरेल, लहान मुलांना काहीच लक्षणे येत नाही. त्यांची तपासणी केली, तर ते पॉझिटिव्ह आढळतील पण त्यांची लक्षणे गंभीर होत नाही.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप म्हणाले, तिसर्‍या लाटेत लसीकरण हेच शस्त्र आपल्याकडे असल्याने आजपर्यंत ८५ टक्के लसीकरण झालेले आहे. उर्वरित १५ टक्के लोकांनी लसीकरण करून सहकार्य करून स्वतःची सुरक्षितता निर्माण करावी पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले ४८ हजार लोक अजून दुसरा डोस घेणे बाकी आहे त्यांनी या आठवड्यात लसीकरण करून घ्यावे १५ ते १८ वयोगटातील १५ हजार मुले असून पैकी ९ हजार मुलांनी लसीकरण केले आहे. उर्वरित ६ हजार मुलांनी येत्या दोन-तीन दिवसात लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

या बैठकीस आ. काळे, तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. गायत्री कांडेकर आय. एम. आय. अध्यक्ष डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, झेडपी सदस्य सोनाली रोहमारे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, कारभारी पाटील आगवण, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसणे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ. अजय गर्जे , डॉ. अमोल अजमेरे, डॉ. आतिष काळे, डॉ. रणदिवे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page