गुरु शुक्राचार्य यांची वंशावळी महिरप फ्रेम-बाळासाहेब आव्हाड

गुरु शुक्राचार्य यांची वंशावळी महिरप फ्रेम-बाळासाहेब आव्हाड

Guru Shukracharya’s Genealogy Mahirap Frame-Balasaheb Awhad

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 11Jan.2022 18.00Pm.

कोपरगाव :शहरानजीक असलेल्या बेट भागातील परमसद्गुरु श्री गुरु शुक्राचार्य महाराज यांना मंदिर प्रशासनाच्या वतीने गुरु शुक्राचार्य यांची वंशावळी महिरप फ्रेम नुकतीच बनवण्यात आली आहे. अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली.

दहा बाय उंच व आठ फूट रुंद व त्याला दोन सिंहाच्या प्रतिमाअशी ही वंशावळी फ्रेम ऍक्रेलिक पद्धतीची आकर्षक अशी बनवण्यात आली आहे.                       

त्या आधी गुरु शुक्राचार्य यांना सिंहासन बनवले असून त्या सिहासनाला येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर रामदास आव्हाड यांनी चांदीचा मुलामा देण्याचे कबूल केले आहे.  सिंहासनाचे पुजन करीत असतानाच डॉ. आव्हाड यांनी लगेचच सिंहासनाला चांदीचा मुलामा देण्याचे गुरु शुक्राचार्य मुखवट्याच्या साक्षीने कबूल केले आहे. चांदीच्या सिंहासनाचे काम करणाऱ्या कारागिरांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.                               

  वंशावळी ची फ्रेम व सिंहासन श्रीरामपूर येथील स्वामी आर्ट चे चालक कलाकार रोहिदास राऊत यांनी केले असून हे वंशावळी व सिंहासन संपूर्ण ऍक्रेलिक पद्धतीने बनवले आहे ,त्यांनी याआधी या मंदिरासाठी दोन वर्षापूर्वी दोन मोठाले हत्ती गजराज मंदिरासाठी तयार करून दिले होते नुकतीच ही वंशावळी फ्रेम मंदिरास अर्पण करण्यात आली. अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली.                       

 यावेळी सचिन परदेशी, प्रसाद प-हे ,मुन्ना आव्हाड ,संजय वडांगळे, विकास शर्मा, विशाल राऊत, भागचंद रुईकर, डी एन आव्हाड सर यांच्यासह नागरिक सोशल डिस्टंसिंग पळून उपस्थित होते.       

  चौकट.                                   

   जगातील एकमेव मंदिर आलेल्या गुरु शुक्राचार्य मंदिरात विविध बदल केले जात आहेत, मंदिराची महती जागतिक पटलावर नेण्यासाठी आता येणाऱ्या शिवरात्रीच्या मुहूर्तावर गुरु शुक्राचार्य यांचे पुस्तक प्रकाशन तसेच पिंडीस चांदीचा मुलामा ,जुन्या सागवान खांबांना फ्रेम चे आवरण तसेच डेकोरेशन करण्याचा मानस मंदिर प्रशासनाचा आहे असे श्री आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page