लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु : आ. आशुतोष काळे
Road work to Lumbini Buddha Vihar started: Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 12Jan.2022 17.20Pm.
कोपरगाव: लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात झाले होते या दुर्लक्षित लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १४ लक्ष ९० हजार रुपये निधीतून रस्त्याचे काम सुरु होवून नागरिकांच्या समस्या दूर झाल्याचे मोठे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
यावेळी परमपूज्य भन्ते कश्यप, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते विरेन बोरावके, सुनील शिलेदार, सुनील मोकळ, दिनकर खरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, सचिन परदेशी, राहुल देवळालीकर, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, सौ. माया खरे, अॅड. नितीन पोळ, सुरेश मोकळ, विजय त्रिभुवन, अजय विघे, माधवराव त्रिभुवन, किरण बागुल, रंभाजी रणशूर, रमेश घेगडमल, राजेंद्र पगारे, नानासाहेब रणशूर, शंकर घोडेराव आदी उपस्थित होते.





