रस्ते विकासाचा आरसा तर देवस्थाने समृद्ध सांस्कृतिक वारसा – आ. आशुतोष काळे
Roads are a mirror of development, while temples have a rich cultural heritage. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 12Jan.2022 17.30Pm.
कोपरगाव: श्री साई संस्थान अध्यक्ष पदामुळे मतदार संघाच्या विकासाबरोबरच तीर्थक्षेत्रांचा देखील विकास करण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कारण रस्ते विकासाचा आरसा असतात तर आपली देवस्थाने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असल्याचे दर्शन घडवित असल्याचे प्रतिपादन साई संस्थान अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी पुणतांबा येथील विविध कामांच्या कामाच्या प्रसंगी केले.
आ.काळे पुढे म्हणाले की, पुणतांबा गावाला ऐतिहासिक, पौराणिक महत्व आहे. या भूमीत गोदावरी नदी दक्षिण वाहिनी होत असून योगीराज चांगदेव महाराज यांचे गोदातीरी असलेले समाधीस्थळ, अवघ्या महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पुणतांब्याला धार्मिक महत्व आहे. ब्रम्हलीन ह.भ.प. सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७५ वर्षाच्या अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा असलेल्या व राज्यात दरवर्षी विविध ठिकाणी होणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहाचे ठिकाण याच पवित्र भूमीत निश्चित केले जाते. अशा अनेक धार्मिक गोष्टींमुळे पुणतांबा तीर्थक्षेत्री सतत भविकांची मांदियाळी असते. त्यादृष्टीने मतदार संघातील सर्वच तीर्थक्षेत्रांबरोबरच योगीराज चांगदेव महाराज देवस्थानचा देखील विकास करून भाविकांसाठी सर्वप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या योगीराज चांगदेव महाराज देवस्थान व मंदिर परिसराची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सरपंच, सदस्य व ग्रामस्थांसमवेत पाहणी करून भक्तांसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत चर्चा करून तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.
यावेळी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सरपंच शिवाजी साबदे, उपसरपंच महेश चव्हाण, सुभाष वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, शांतीलाल भाटी, अभय चव्हाण, आप्पासाहेब चव्हाण, साहेबराव बनकर, प्रकाश बनकर, लहानु बनकर, सुदाम बनकर शंकरराव चौधरी, अशोक बोरबने, अशोक शिंदे, जालिंदर इंगळे, विजय अंबडकर, शैलेश कुलकर्णी, अरुण बाबरे, सुहास वहाडणे, राम चव्हाण, विलास पेटकर, आनंद भाटी, अशोक धनवटे, संदीप चव्हाण, भैया पिसे, सुनील थोरात, दिलीप चौधरी, मच्छिंद्र चौधरी, छगनराव जोगदंड, पंडितराव चौधरी, आण्णासाहेब कोते, गुलशेर शेख, सीताराम पगारे, तुळशीराम दहिफळे आदी उपस्थित होते.





