भव्य ऑनलाईन रांगोळी स्पर्धा – सौ सुहासिनी कोयटे

भव्य ऑनलाईन रांगोळी स्पर्धा – सौ सुहासिनी कोयटे

Grand Online Rangoli Competition – Mrs. Suhasini Koyte

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 12Jan.2022 17.40Pm.

 कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांपैकी एक घर , एक रांगोळी या उपक्रमांतर्गत १३ जानेवारी ते १६ जानेवारी रंगकला प्रॉडक्शन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात असून ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येत असून फक्त कोपरगाव तालुक्यातील स्पर्धकांसाठी मर्यादित असून विनामूल्य आहे. जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे.असे आवाहन समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी केले.

स्पर्धासाठी नियम व अटी खालीलप्रमाणे – १) स्पर्धेसाठी विषय, आकार,रंगाचे कोणतेही बंधन नाही.२) रांगोळी १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत काढलेली असावी. ३) स्पर्धेसाठी काढलेल्या रांगोळी सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र असावेत. ४) एकाच रांगोळीचे दोन फोटो पाठविल्यास ती रांगोळी स्पर्धेतून बाद केली जाईल. ५) एका कुटुंबातील एकच रांगोळी स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. ६) स्पर्धेसाठी पाठविण्यात येणाऱ्या रांगोळीच्या छायाचित्राखाली स्पर्धकाने नाव,पत्ता, मोबाईल क्रमांक,आणि वय नमूद करावे. ७) स्पर्धेचे परीक्षक रांगोळी परीक्षणासाठी रांगोळीचे छायाचित्रे पाठविलेल्या दिवशी कधीही स्पर्धकाच्या घरी जाऊन परीक्षण करू शकतील. ८) परीक्षक आणि आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. ९) स्पर्धेतील विजेत्यांचा निकाल आणि बक्षिसे विजेत्यांशी संपर्क करून दिली जातील. १०)९१५८२७६६८५,९५०४९५९५१०,९८२२५२८३२८ वरील व्हाट्सअप क्रमांकावर वर रांगोळीचे छायाचित्र, नांव,पत्ता, मोबाईल क्रमांक व वयाची माहिती पाठवावी तसेच अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

You cannot copy content of this page