बाळासाहेब ठाकरे कॉलेजात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.
Celebration of Rajmata Jijau and Swami Vivekananda Jayanti at Balasaheb Thackeray College.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 12Jan.2022 17.50Pm.
कोपरगाव: आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे, म्हणजेच प्रेम, आपुलकी, त्याग , सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम, सामर्थ्य, यांचा संगम आहे आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्यजननी जिजाबाई भोसले म्हणजेच जिजाऊ. प्रभुत्व मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापना करणे हा शिवाजी महाराजांच्या समजुतीमागे जिजाऊंची संस्कृती कारणीभूत होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना राजकारण करण्याचे, समान न्याय देण्याचे आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे धैर्य दिले होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.जावळे यांनी केले.
प्राचार्य डॉ.जावळे म्हणाले,एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येतो. अशा प्रेरक विचारांची पेरणी करणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.स्वामी विवेकानंद हे स्वतः आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सजग होते.आपल्या कृतीतून त्यांनी युवकांना बोध दिला. ‘उठा जागे व्हा’ या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





