ठेकेदारांनो गुणवत्तापूर्ण विकासकामे वेळेत करा – आ. आशुतोष काळे

ठेकेदारांनो गुणवत्तापूर्ण विकासकामे वेळेत करा – आ. आशुतोष काळे

Contractors do quality development work on time – Mla Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 18.00Pm.

कोपरगाव :शहरातील विकासकामे ठेकेदारांनी वेळेत व गुणवत्तापूर्ण करावी.अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही अशी तंबी श्री साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी शहर विकासकामांच्या आढावा बैठकीत ठेकेदारांना दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक कामे सुरु असली तरी कामे अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. ठेकेदार मुदतीच्या आत विकासकामे पूर्ण करण्यासाठी उदासीन दिसून येत आहेत. ज्या ठेकेदारांकडून विकास कामे वेळेत आणि दर्जेदार होणार नाही अशा ठेकेदारांची गय केली जाणार नाही असे त्यांनी प्रत्यक्ष विकासकामांची पाहणी करून सबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या

Leave a Reply

You cannot copy content of this page