स्वस्त धान्य दुकानदारांना डिसेंबरचा शिधा तात्काळ वितरीत करावा -सौ.स्नेहलता कोल्हे
Cheap rations should be distributed to cheap grain shopkeepers immediately – Mrs. Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 18.20Pm.
कोपरगांव : जानेवारी मध्यावर येवुन ठेपला आहे तरी अद्यापही डिसेंबर महिन्यांचे केंद्र व राज्य शासनामार्फत वितरीत केले जाणारे स्वस्त धान्य अद्यापही शिधापत्रिका लाभधारकांना मिळालेले नाही त्यामुळे गोर-गरीब सर्वसामान्यांची परवड होत आहे तेंव्हा याप्रकरणी लक्ष घालुन कोपरगांव मतदार संघातील लाभधारकांना हा शिधा तात्काळ वितरीत करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या मागणीत पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यजनांचे हाल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी नागरिकांना मदतीचा हात म्हणून मोफत स्वस्त धान्य पुरवठा केलेला आहे, त्याचा आधार सर्वसामान्य कुटूंबातील गरजवंत, मजुर, वंचित, ज्यांच्या हातांना रोजगार नाही त्यांना झालेला आहे. मात्र गेल्या महिन्याचा शिधा अद्यापही रेशनदुकानांवर आलेला नाही यासंदर्भात तहसिलदार विजय बोरुडे यांच्याकडेही मागणी केली आहे. स्वस्त धान्य पुरवठा न झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत वितरीत होणारा शिधा तात्काळ मिळावा कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका सध्या वाढतो आहे. प्राथमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षणही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवले आहे., तेंव्हा प्रशासकीय यंत्रणेने डिसेंबर महिन्याचा शिधा तात्काळ रेशनकार्ड लाभार्थ्यांना वितरीत करून दिलासा द्यावा असेही त्या शेवटी म्हणाल्या.





