नगर जिल्हयातील सतरा साखर कारखान्याकडुन ५७ लाख ८० हजार मे. टन उसाचे गाळप
57 lakh 80 thousand mt from seventeen sugar factories in Nagar district. Tons of sugarcane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 18.30Pm.
कोपरगांव : अहमदनगर जिल्हयातील २२ कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी ७ जानेवारी पर्यंत ५७ लाख ८० हजार ५०४ मे टन उसाचे गाळप करून त्यापासून ५३ लाख ५५ हजार ९०० साखर पोत्यांचे उत्पादन करून दैनंदिन साखर उतारा १०.५६ टक्के मिळविला आहे.
जिल्हयातील साखर कारखान्यांचे गाळप में टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे.
सहकारमहर्षि कोल्हे (३,२१,२८८) (२,७४,३५०), कर्मवीर काळे (२.८३,४८६) (२,७१,३००) (१०.८०), विठ्ठलराव विखे पाटील (३,१४,१००) (२,४७,६५०) (८.२०).सहकारमहर्षि थोरात (५,३२,६५०) (५,२८,०९०) (११.००), डॉ. बाबुरावदादा तनपुरे राहुरी (१,६२, ९१८) (१,६२,०००) (१०.९६), सहकारमहर्षि नागवडे श्रीगोंदा (४,०१,३९१) (४,०७,२२५), (११.०१), ज्ञानेश्वर (५,६९,८६०) (५,०८,७५०).(११.१५). मुळा (४,८६,०८०) (३,९९,१५०), अगस्ती (२,२६,४२४) (२,३६,८१०). (११.६१). वृध्देश्वर (१,९२,८८०) (१,७३,७५०) (११.४०), कुकडी (३,५०,०५०)(३,३४,५५०). (१०.६०), अशोक (२.७९,७३०) (२,९४,१५०). (११.३५) गणेश (१,४५,०००) (१,०५,८००), (९.२८) केदारेश्वर (१,८३,०००) (१,५१,०५०), (९.२८) गंगामाई (४,६२,१४०) (४,०६,२५०). (१०.७५), अंबालिका (८,०८,०९५)(७,९५,७५०), (१०.७१), कांती शुगर (६१,४१२)(५९,२७५), (१०.४०)





