नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

Filed a case against one of the sellers of nylon Manja

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 19.40Pm.

 कोपरगाव :  नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी बंदी घातलेली असताना कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या पतंग असारी विकणाऱ्या तुळशीदास शिवलिंग पवार (६२) राहणार पवार सरकार वाडा याने प्लॅस्टिक कृत्रिम पक्क्या धाग्या पासून बनवलेल्या मांजाच्या विक्री मुळे पक्षांना प्राण्यांना व मानवी जीवितास इजा होऊन अपघात घडून १८ जून २०१६ अन्वये काढलेल्या निर्देशाची अवज्ञा करून इतरांचे जीविताची सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करून त्याच्या घरासमोर नायलॉन मांजाची विक्री करीत असताना मिळून आला.

त्याच्याकडे नायलॉन मांजाची चार रिळ प्रत्येकी पाचशे रुपये किंमत एकूण किंमत दोन हजार रुपये किमतीचा मांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आहे अशी माहिती फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विलास मासाळ यांनी दिली .                                     

 तुलसीदास पवार यांचे विरोधात शहर पोलिस ठाण्यात भा द वि १८८, ३३६ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे क्रमांक ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहे. सदर कारवाईमुळे पतंग विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून याबाबत शहरात कुठे कुठे नायलॉन मांजा विक्री होत आहे याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page