करोना: कोपरगावात आज ३२ नव्या रुग्णांचे निदान,
Corona: 32 new patients diagnosed in Kopargaon today,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 15Jan.2022 17.20Pm.
कोपरगाव: शनिवारी कोरोना संसर्ग तपासणीचे रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये ३३४ अहवाल प्राप्त झाले. त्यात २२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. याशिवाय खाजगी लॅब मधून १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे शनिवारी ३२ नव्या रुग्णांचे निदान झाले असून १३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १७८ वर खाली आली आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
हायलाइट्स: गेल्या २४ तासांत कोपरगावात ३२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण १३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
याबाबत अधिक माहिती देत असताना डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, कोपरगावात पहिली दुसरी आणि तिसरी लाटेत आतापर्यंत एकूण २ लाख ४७ हजार ९१५ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या, यात संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) एक लाख २० हजार १५४ चाचण्या करण्यात आले तर रॅपिड ॲटीजेनमध्ये एक लाख २७ हजार ७६१ चाचण्या करण्यात आल्या, जात यात एकूण १५ हजार ३५१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.पैकी १४ हजार ४९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दुर्दैवाने आजपर्यंत २२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कोरोना मुळे मृत्यू दर १.४९ टक्के इतका आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३५ टक्के इतके आहे. सक्रिय रुग्णसंख्या १७८ आहे. सद्यस्थितीत कोरोना बाधित रुग्ण दर ६.१९ टक्के आहे. असेही त्यांनी शेवटी सांगितले.





