कोपरगावचा सक्षम लवांडे टाकळी ढोकेश्वर विद्यालय बारावी विज्ञान शाखेत पहिला
सीबीएसई मार्च २०२० : ५०० पैकी ४७८ गुण ( ९५. ६० %)
वृत्तवेध ऑनलाइन 14 July 2020
By : राजेंद्र सालकर
कोपरगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने सीबीएसई मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेमध्ये ५०० पैकी ४७८ (९५.६०%) गुण मिळवून कोपरगावचा सक्षम राजेंद्र लवांडे हा टाकळी ढोकेश्वर विद्यालय बारावी विज्ञान शाखेत पहिला आला आहे.
सक्षम लवांडे हा भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमावले आहे.
कोपरगाव येथील राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त सहाय्यक आगार व्यवस्थापक भाऊसाहेब पोटभरे यांचा तो नातू असून महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक राजेंद्र लवांडे यांचा तो मुलगा आहे. त्याच्या यशाबद्दल ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे, संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, नितीन कोल्हे प्राचार्य एस. पी. बोरसे सहकारी प्राध्यापकांनी विशेष अभिनंदन केले आहे.