कोपरगाव रा. स्वं. संघाच्या स्वयंसेवकांकडून भगव्या ध्वजाची गुरुपूजा- सुरेश विसपुते
वृत्तवेध ऑनलाईन 14 July 2020
कोपरगाव :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे स्वयंसेवक भगव्या ध्वजाला गुरु मानतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते भगव्या ध्वजाची पूजा करतात. गुरुपूजन संघाच्या मुख्य सहा उत्सवापैकी महत्वाचा उत्सव आहे. असल्याची माहिती तालुका संघचालक सुरेश विसपुते यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना सुरेश विसपुते म्हणाले, आरएसएस जगातली अशी एकमेव संघटना आहे. या संघटनेचे स्वयंसेवक कोणा व्यक्तीला गुरू मानत नाही, तर प्रतीकात्मक म्हणून भगव्या ध्वजाला गुरु मानतात. याबाबत आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांचे म्हणणे होते की, माणूस हा चंचल असल्याने वेळ परतवे तो बदलू शकतो, तो आपल्या ध्येयापासून भरकटल्यानंतर मोठी अडचण निर्माण होते. संघात व्यक्तीपेक्षा ध्येयाला महत्त्व असल्याने ध्येयाचे प्रतीक म्हणून भगवा ध्वज आहे. हा ध्वज केवळ कपडयाचा टुकडा नाहीं,तर राष्ट्रीय संस्कृति ओळख आहे. तो त्याग, बलिदान, व तेजाचे प्रतीक आहे. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी संघाचे स्वयंसेवक भगवा ध्वजाची पूजा करतात.