नैसर्गिक आपत्ती रोखणे अशक्य पण मानव निर्मित आपत्ती रोखणे शक्य – विवेक साळवे
It is impossible to prevent natural disasters but it is possible to prevent man-made disasters
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 20Jan.2022 17.30Pm.
कोपरगाव : नैसर्गिक आपत्तीला रोखणे हे आपल्या हातामध्ये नाही परंतु कृत्रिम किंवा मानवनिर्मित आपत्तीला रोखणे किंवा त्यावर व्यवस्थापन करणे हे सर्वांच्या हातामध्ये आहे. असे मत गॅस सेल्फ इंडिया लिमिटेडचे ऐरिया सेल्स मॅनेजर विवेक साळवे यांनी के. जे. सोमय्या कॉलेजमध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन’ या कार्यशाळेत केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी.एस.यादव हे होते. कार्यशाळेचे उद्घाटन को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे यांनी केले.
विवेक साळवे यांनी एल.पी.जी. गॅस सिलेंडर प्रयोगशाळा, वसतिगृह व इतर ठिकाणी वापरतांना घ्यावयाची काळजी व आपत्तीच्या वेळी करावयाची उपाययोजना या संदर्भात विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. नैसर्गिक व मानवनिर्मित आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने आग विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था केली जाते. परंतु हे यंत्र चालविण्याची माहिती अनेकांना नसते. फायर एक्स्टिंग्विशर आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशाप्रकारे वापरावे याची माहिती व प्रात्यक्षिक त्यांनी यावेळी दिली.
प्राचार्य डॉ.यादव म्हणाले, शिक्षक व विद्यार्थी यांना जोडणारा महत्वाचा सेतु कार्यालयीन कर्मचारी हा असतो. आपत्तीच्या काळात प्रशासकीय कर्मचारी जर प्रशिक्षित असेल तर तो होणाऱ्या दुर्घटनेला रोखु शकतो. याच उद्देश्याने अश्या कार्यशाळेचे आयोजन केले जाते असे नमूद केले.
या कार्यशाळेसाठी विश्वस्त संदिप रोहमारे, विज्ञानशाखा प्रमुख प्रो. बी. बी. भोसले, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. विजय ठाणगे, डॉ. अभिजीत नाईकवाडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.