संजस्वा हॉस्पिटल सेवेतून श्री जनार्दन स्वामींचा वारसा पुढे नेत आहे – वैभव डांगे
Sanjaswa Hospital is carrying on the legacy of Shri Janardhan Swami through its services – Vaibhav Dange
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 20Jan.2022 16.40Pm.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागामध्ये गोरगरीब गरजू रूग्णांची सेवा करण्यासाठी कातकडे पिता-पुत्रांनी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल (संजस्वा) यांनी सुरू केले या रुग्णालयात अत्याधुनिक सोयी सुविधा व अल्प दरांमध्ये उपचार करण्यात येतात ही बाब कौतुकास्पद आहे, रुग्णांची सेवा करून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचा वारसा ते पुढे नेत असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे खाजगी सचिव व नॅशनल हायवे अथोरिटी चे सल्लागार वैभव डांगे व्यक्त केले व एसजीएस रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच हृदयशस्त्रक्रिया तसेच इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विविध रोगांवर इलाज ग्रामीण भागांमध्ये केले जात आहेत हे बघून ते भारावून गेले. ग्रामीण भागात सुरू असलेल्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले.उपस्थित पाहुण्यांचा श्री संत जनार्दन स्वामी रुग्णालयाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंत्री गडकरी सचिव वैभव डांगे , सुदर्शन न्यूज चॕनलचे रामदास चव्हानके राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फौंडेशनचे चेअरमन चांगदेवराव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे , उद्योजक विजय कडू, स्थापत्य अभियंता दिपक कोटमे, जनार्दन स्वामी आश्रमाचे व्यवस्थापक विजय जाधव, प्राचार्य डॉ. नितिन जैन, डॉ गिते, डॉ सावनी यारनाळकर, विश्वस्त अनूप कातकडे डॉ. इर्शाद अली, डॉ. अन्वर, प्रशासकीय अधिकारी सचिन जानवेकर आदी उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष चांगदेव कातकडे यांनी केले तर विश्वस्त अनुप कातकडे यांनी आभार मानले.