समताज सहकार मिनी मॉल हा महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविणारा आहे –सौ सुषमा देसले,

समताज सहकार मिनी मॉल हा महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविणारा आहे –सौ सुषमा देसले,

Samataj Sahakar Mini Mall is empowering and self reliant for women – Mrs. Sushma Desale,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 20Jan.2022 16.50Pm.

 कोपरगाव : समता पतसंस्थेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गट आणि स्थानिक महिला उद्योजिका, व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता नागरी सहकारी पतसंस्था आणि समता महिला बचत गट यांच्या माध्यमातून समताज सहकार मिनी मॉल मुळे कोपरगाव बाजारपेठ पुनः एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येईल. यामुळे महिलांना या माध्यमातून आर्थिक स्थिरता प्राप्त होऊन त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करता येणार आहे’. महिलांसाठीचा हा उपक्रम कौतुकास्पद असून महिलांमधील कलागुण विकसित करण्याबरोबरच महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविणारा आहे’. असे प्रतिपादन दहीवद येथील लोकनियुक्त सरपंच व जळगाव जिल्हा सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सौ.सुषमा वासुदेव देसले यांनी समताज सहकार मिनी मॉल चे उद्घाटन केले.

या वेळी माजी नगराध्यक्षा सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, सौ.विद्या सोनवणे,सौ.उज्वला जाधव,समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालिका सौ.शोभा दरक यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत समता सहकार उद्योगिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

‘समता सहकार उद्योगिनी’ पुरस्कार लता चौधरी, किरण डागा, किरण दगडे, राजश्री गुजराथी, रुपाली अमृतकर, सिमरन खुबाणी, शालिनी खुबाणी, भारती गोयल, रेखा भंडारी, योगिता कोठारी, निकिता रोडे, रश्मी कडू, राधिका शिरोडे, कीर्ती बागरेचा, स्मिता पोळ, मिताली लोंगाणी,श्रेया मालकर, नेहा ठोळे, श्वेता बंब, स्तुति ठोळे, श्रेया अजमेरे, सारिका काले, अपर्णा बज, स्वाती उराडे, जानव्ही आढाव, छाया अबक, अर्चना अजमेरा, विद्या सोनवणे, शिल्पा अजमेरा, असमत नबील, छाया ओस्तवाल, सिमरन मंटाला, मनीषा काले, नीलम लोहाडे आदि महिलांना देण्यात आला. सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, सौ.विद्या सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत समता सहकार मिनी मॉल चे माध्यमातून कोयटे परिवाराने तालुक्यातील महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून या सुवर्ण संधीचा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातीलही अनेक महिला बचत गटांनी लाभ घ्यावा.

पुरस्कारप्राप्त उद्योजिका सौ.सारिका काले, कीर्ती बागरेचा, सौ.छाया अबक यांनीही मनोगत व्यक्त करत मनोगतातून कोयटे परिवाराने महिलांना प्राप्त करून दिलेली हि सुवर्ण संधी प्रत्येक महिलेने अंगीकारून मार्गदर्शक करणारे काका कोयटे आणि समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांचे आभार मानले.

परिचय सौ.स्वाती कोयटे यांनी तर प्रमुख उपस्थितांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालिका सौ.शोभा दरक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी समता महिला बचत गटाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचलन आभार सौ.स्वाती कोयटे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page