त्यांना उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार आहे का?- बाळासाहेब रुईकर
Do they have the moral right to inaugurate? – Balasaheb Ruikar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 23Jan.2022 18.40Pm.
कोपरगाव : मागील पाच वर्षात कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत असतांना व सर्व समित्यांचे सभापती त्यांच्या पक्षाचे असतांना देखील कोपरगाव शहरात एकही ठोस विकास काम झालेले नाही. ज्यांनी विकास कामांना मंजुरी दिली व या कामांना स्थगिती मिळविण्यासाठी न्यायालयात पाठविले. त्यांना कोपरगाव शहरातील विकास कामांचे उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब रुईकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून विरोधकांना केला आहे.
कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत खूपच मागे पडले व त्याचा विपरीत परिणाम कोपरगावच्या बाजारपेठेवर झाला.
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून शहरविकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांसह विकास कामे झाल्यास बाजारपेठ फुलण्यास मदत होणार होती असेही पत्रकात नमूद केले आहे. तुम्हाला विकास कामांची उद्घाटने करायची होती तर शहरातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे जवळपास एक वर्षापूर्वीच ज्या वेळी विकास कामांना मंजुरी देण्यात आली त्याच वेळी उद्घाटने झाली असती असेही रुईकर यांनी पत्रकात म्हटले आहे.