आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीला दिनेश लाड सरांचे मार्गदर्शन

आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीला दिनेश लाड सरांचे मार्गदर्शन

Guided by Dinesh Lad Saran to Atma Malik Cricket Academy

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9Fab2022 15.30Pm.

कोपरगाव : मुंबई येथील क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड सर यांनी आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीला सदिच्छा भेट दिली.

लाड सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले रोहित शर्मा व शार्दुल ठाकुर असे नावाजलेले खेळाडू सध्या भारतीय संघात खेळत आहे. दिनेश लाड सरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन प्रसंगी त्यांनी खेळाडूंना संबोधित करताना आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. खेळाडू स्व-आत्माविष्काराच्या बळावरच जीवनात महान उंचीवर पोहोचतो, असे नमुद केले.               

मागील काही वर्षापासून मुंबईमध्ये आत्मा मालिक क्रिकेट ॲकॅडमीचे नाव कानावर पडत होते. त्या उत्सुकतेपोटी त्यांनी आत्मा मालिक क्रिकेट ॲकॅडमीला भेट देत मैदानाची पहाणी केली. गुरुदेवांच्या शैक्षणिक व आध्यात्मिक कार्याची माहिती घेतली. मुंबईमध्ये दिनेश लाड फाउंडेशन अंतर्गत बऱ्याच गोर-गरीब खेळाडूंना लाड सरांकडून मोफत प्रशिक्षण दिले जाते.

अशाच खेळाडूंना बरोबर घेऊन मार्च महिन्यामध्ये लाड सर आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीचा चार दिवशीय दौरा करणार आहेत. विशेष करून या चार दिवसांमध्ये लाड सर आत्मा मालिक संकुलातील खेळाडूंना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. दिनेश लाड सरांच्या स्वागत प्रसंगी आत्मा मालिक क्रिकेट ॲकॅडमीचे प्रशिक्षक सागर खालकर, कृष्णा सुरासे, संदीप बोळीज सर व संदीप सर उपस्थित होते. तसेच कोल्हार येथील डॉक्टर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.                             

शेवटी दिनेश लाड सरांनी भविष्यात आत्मा मालिक कडून देखील भारतीय संघाला काही खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  ग्रामीण भागात प्रशस्त हिरवेगार क्रिकेट मैदान खेळाडूंना उपलब्ध करून दिल्याबद्दल आत्मा मालिक ध्यानपीठचे विशेष आभार दिनेश लाड सर यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page