कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर
Kopargaon city Shiv Sena executive announced
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9Fab2022 15.40Pm.
कोपरगाव: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शहरातील जुनी कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर काल मंगळवारी नवी कार्यकारिणी अखेर जाहीर केली. पक्षात अलीकडेच आलेल्यांना मिळालेली संधी आणि यापूर्वी पदे भूषवणाऱ्या पदाधिकारी यांना डच्चू देण्यात आल्याने निष्ठावान शिवसैनिक व्यथित झाल्याची चर्चा आहे.
आगामी नगरपालिका निवडणूक कधी लागू शकते अशा काळात महिना दीड महिन्यापूर्वी शहर कार्यकारणीच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना अचानक डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून शहराच्या नवीन कार्यकारिणीची चर्चा सुरू झाली. त्याचा मुहूर्त आता मंगळवारी (८) रोजी निघाला. यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांचा पत्ता पूर्णत: साफ झाला आहे. डच्चू देण्यात आल्यानंतर या पदाधिकाऱ्यांचा नव्या कार्यकारिणीत समावेश करून त्यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती. तसे त्यांना सांगण्यातही आले होते, प्रत्यक्षात मात्र, कार्यकारिणीत या पदाधिकाऱ्यांना कुठेही स्थान मिळाले नाही.
शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज. नगरपालिका निवडणुकीचा विचार करता आजी-माजी पदाधिकारी आणि नव्या-जुन्या शिवसैनिकांना एकत्र घेऊन वॉर्डनिहाय संघटन बांधण्यावर भर राहायला पाहिजे होता.यासोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत आणि त्यांना मदत व्हावी, यासाठी उपाययोजना करावयास पाहिजे होत्या. तसे न होता केवळ कार्यकारणी जाहीर झाल्यामुळे संघटन मजबूत होण्याऐवजी अंतर्गत धुसफूस वाढली आहे.
नव्या कार्यकारिणीत बाळासाहेब साळुंके, राहुल देशपांडे, गोपाळ वैरागळ,सागर सोमवंशी, प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,शेखर कोलते, सुनील कुंढारे,मयूर दळवी, किरण अडांगळे,योगेश उशीर,नितीन राऊत, वैभव गिते,दिपक बरदे,अक्षय वाकचौरे, मंगेश देशमुख, किरण सूर्यवंशी, सतीश शिंगाणे, शैलेश वाघ, गौरव गुप्ता,मधू पवार,राहुल हंस्वाल, विजय सोनवणे, प्रमोद बोथरा, निखिल मढवई,नयन पवार, पंकज जाधव, सुनील राका,राहुल वाघ, महेश गायकवाड, जाफर पठाण, मनोज बनकर,करण दळवी, सतीश खर्डे, अक्षय वराडे,ऋषिकेश पवार, बाळासाहेब लकारे,सागर गवारे, सुरेश पंडोरे, मोबिन शेख,सलमान शेख, विक्रांत खर्डे,उमेश छुगाणी,कल्पेश मंडलिक, शिवाजी काकडे, सुरेश वाघ, विशाल खरात, सोमनाथ पवार, शाहरुख कुरेशी,किशोर भालेराव, मयूर शिवदे, राज सोळसे, रवि मोरे, लखन सूर्यवंशी, राहुल यशवंत, दिनेश भालेराव, अविनाश जाधव, जमशेर शिल्पेकर, अवि मेहेरे, महेश उगले, किरण गरुटे, सचिन लिंबोरे,सागर महाजन. यांचा समावेश आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख कलविंदर दडियाल, जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.





