कोपरगांवात विवेक कोल्हे चषक क्रिकेट स्पर्धेस सुरूवात 

कोपरगांवात विवेक कोल्हे चषक क्रिकेट स्पर्धेस सुरूवात

Vivek Kolhe Cup cricket tournament begins in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9Fab2022 16.00Pm.

कोपरगांव : भाजपा युवा मोर्चा व संकेत इलेव्हनच्या सहकार्याने शहरातील फादरवाडी परिसरात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे चषक भव्य प्लॅस्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन शहराध्यक्ष अविनाश पाठक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. क्रीडापटूंमध्ये खेळाविषयी जागृती तयार होवुन त्यातुन अष्टपैलू खेळाडु घडावे असा प्रयत्न युवानेते विवेक कोल्हे यांचा असल्याचे अविनाश पाठक यावेळी बोलतांना म्हणाले.

याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, असिफ पठाण, फिरोज पठाण, शिवाजी खांडेकर, विकी मंजुळ, स्वप्नील निखाडे, अशोक लकारे, नरेंद्र लकारे, सागर अहिरे, अल्ताफ पठाण, बापू कुमावत, वेदांत शिंदे, अक्षय देसाई, किरण लहिरे, तुषार सोनवणे यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.         

 या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघास ३१ हजार व विवेक कोल्हे चषक (पहिले), २१ हजार व चषक (सागर आहेर दुसरे), ११ हजार व चषक (स्वप्नील मंजुळ तिसरे), तर ७ हजार व चषक (फिरोज पठाण, असिफ शेख चौथे), उत्कृष्ट क्रिकेट संघास २१०० रूपये, बेस्ट बॅटसमन व बेस्ट बॉलर याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. यासाठी प्रत्येक संघास ३ हजार १०० रूपये प्रवेश फि ठेवण्यात आली आहे.      

   सदरच्या क्रिकेट स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्वश्री शोएब सययद, संकेत साठे, श्रीकांत सानप, फैजल शेख, फरदिन शेख, नहिम शेख, आकाश पंडोरे, राहुल गायकवाड, अजय गायकवाड, ऋषी पवार, अरफत शेख, मावळा व अक्सा ग्रुपचे सर्व सहकारी, शोएब मौलाना आदि प्रयत्नशिल असुन विजेत्या संघाच्या चषकासाठी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, अक्सा ग्रुपचे संस्थापक अल्ताफभाई पठाण यांचे विशेष सौजन्य लाभले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page