शेततळ्यात पडून तरूण पती-पत्नीचा मृत्यू

शेततळ्यात पडून तरूण पती-पत्नीचा मृत्यू

Young couple dies after falling into farm

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9Fab2022 16.10Pm.

कोपरगांव :विज पुरवठा खंडीत झाल्याने शेततळयावर जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेल्या पतीपत्नीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आंचलगांव शिवारात गट नं.१६९ मधील शेततळयात घडली आहे. शोकाकुल वातावरणात शवविच्छेदनानंतर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

निलेश रावसाहेब शिंदे (२६) व पुजा निलेश शिंदे(२३ ) रा.आंचलगांव अशी मृतांंची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आंचलगांव शिवारात गट नं.१६९ मधील शेततळयावर विजपुरवठा खंडीत झाल्याने जनावरांसाठी पाणी आणण्यास गेला असतां त्याचा तोल जावून प्लास्टीक कागदावरुन घसरुन तो थेट शेततळयात पडला यावेळी त्यावेळी आरडाओरडा केला त्यावेळेस त्याची जवळ असलेली पत्नी पुजा हिने त्यास हात देवून वर काढण्याचा प्रयत्न केला असता तीही घसरुन पाण्यात पडून पोहता येत नसल्याने बुडून दुर्देवी मृत्यू झाला. मयत निलेश हा उच्च शिक्षित होता वर्षभरापूर्वी पुजा बरोबर त्याचे लग्न झाले होते. मात्र नियतिच्या मनात वेगळेच असल्याने त्या दोघांची अधुरी एक कहानी राहुन दोघेही मयत झाल्याने आंचलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत नितिन अंबादास शिंदे रा.आंचलगांव यांनी ग्रामिण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. झालेल्या घटनेबद्दल पोलीसांनी पंचनामा केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी व कोपरगांव ग्रामिण पोलीस चौकशी करीत आहेत.
चौकट
पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, खुन मारामार्‍या अपघात आदि घटना होवून त्याबाबत पोलीस डायरीला नोंद करण्यात येते परंतु पत्रकारांनी या घटनांची माहिती विचारली असता संबंधित ठाणे अंमलदार आज कांहीच नोंद नाही, निरंक आहे असे सांगून माहिती देण्याची टाळाटाळ करतात तसेच वरिष्ट अधिकारी देखील महत्वाच्या घटनांची माहिती पत्रकारांना देत नसल्याने तिव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात असून या बाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांना माहिती देत नसल्याबाबत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page