कंटेनरने व्हॅनला दिलेल्या धडकेत सहा जण जखमी

कंटेनरने व्हॅनला दिलेल्या धडकेत सहा जण जखमी

Six people were injured when the container hit the van

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9Fab2022 16.30Pm.

कोपरगांव :शहरालगत नगरमनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुलीवर भरधाव वेगाने येणार्‍या मनमाडकडे जाणार्‍या कंटेनरने मुंबईकडे जाणार्‍या व्हॅनला जोराची धडक दिल्याने व्हॅनमधील सहा जण जबर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११.३० वा. घडली. अपघात एवढा भिषण होता की अपघात होताच व्हॅन पेटली व व्हॅनमधील सहा जखमींना अक्षरश: जवळच असलेल्या हॉटेल आनंद व हॉटेल ब्रम्हा च्या कर्मचार्‍यांनी दरवाजे तोडून बाहेर काढून जवळच असलेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात तातडीने दाखल केले.

या घटनेत चार महिला गंभिर असल्याचे कळते. यासंबंधी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पुणतांबा चौफुलीवर कंटेनर क्र एच आर ५५ ए एफ ८२४३ ही नगरहुन मनमाडकडे भरधाव वेगाने जात असतांना इको मारुती व्हॅन क्र एमएच ०३ एई ५२७७ ही मुंबईकडे जात असतांना तिला कंटेनरने जोराची धडक दिल्याने साहेबराव लक्ष्मण बेंदुरे (४६) चालक रोहिदास दशरथ पानमंद वय स्मिता संदीप मुंडारे, सुनिता संतोष पानमंद अनिता राम साळुंके संगिता साहेबराव बेंदुरे सर्व रा.दहिसर मुंबई हे जखमी झाले यातील चार महिला गंभिर जखमी असल्याचे कळते. अपघात होताच कंटेनर चालक महंमद युसूफ अली रा.रामपूर ता.रुडकी  हरिद्वार उत्तराखंड हा पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.  त्यांना अपघात होताच जवळच असलेले हॉटेल आनंद व ब्रम्हा येथील कर्मचारी व्यवस्थापक सागर पवार,अमोल फटांगरे संजय निकम आदिंनी तातडीने धाव घेत ओमनी गाडीचे दरवाजे तोडीत तातडीने बाहेर काढले गाडीने पेट घेतला होता त्यामुळे पुढील अनर्थ टळला या घटनेची माहिती आनंद जगताप यांनी तातडीने शहर पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांना दिली. देसले यांनी तातडीने अ‍ॅम्ब्युलन्स व कर्मचारी घवून घटनास्थळी धाव घेतली परंतु त्या आधीच जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनी जखमी सहा जणांना संत जनार्दन स्वामी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

चौकट

चौफुलीवर स्पीडब्रेकर,सर्कल व ओव्हरब्रीज होणे गरजेचे: जगताप दरम्यान सध्या रस्त्याची कामे मोठया प्रमाणात चालू आहे बहुतांश रस्ते चांगले झाल्याने चौफुली ओलांडतांनाही वाहने भरधाव वेगात जातात त्यामुळे चारही बाजुंनी स्पिड ब्रेकर टाकणे अत्यंत आवश्यक झाले आहे तसेच मोठया अवजड वाहनांची वहातुक मोठया प्रमाणावर होत असल्याने या चौफुलीवर ओव्हरब्रीज व सर्कल होणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी विघ्नेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगताप यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page