मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोपरगाव तालुका शिवसेनेच्या पत्राची दखल
Note of Kopargaon taluka Shiv Sena’s letter from Chief Minister Uddhav Thackeray
आवास योजनेतील वंचितांना मिळणार न्यायThe deprived will get justice in the housing scheme
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9Fab2022 17.00Pm.
कोपरगाव : प्रधानमंत्री आवास योजनेत ऑटो डिलीट झालेल्या व समितीने जाचक अटीच्या आधारे अपात्र ठरवलेल्या लाभार्थींचा पात्र यादीत समावेश करावा यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून उचित कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना ग्रामविकास मंत्रालयास दिल्या असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.
काल शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांचे सोबत सविस्तर चर्चा केली,याबाबाबत बोलताना गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी ऑटो डिलीट च्या लाभार्थ्यांची फेरसर्व्हेच्या दृष्टीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,राज्य मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इतर अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग बैठक पार पडली असून लवकरच शासन निर्णय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. जे पात्र यादीत आले परंतु समितीने रिजेक्ट केले त्यांचा सर्व्हे परत करण्यात येईल व त्या लाभार्थी वर अन्याय होणार नाही त्याकरिता स्वतः गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ जणांची तालुका समिती पुन्हा सर्वे करणार आहे. अशी शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांना गटविकास अधिकारी यांनी माहिती दिली तसेच घरकुल योजनेतील जाचक अटी दुरुस्त करण्याची या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, विधानसभा कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक कानडे माजी तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे तिरोडा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, उपतालुकाप्रमुख सागर फडे ,रंगनाथ गव्हाणे, बाळासाहेब मापारी , बाळासाहेब राऊत ,राजेंद्र नाजगड, संजय दंडवते, राहुल होन , सचिन असणे ,नानाभाऊ डोंगरे, दिपकराव चौधरी, गणेश बरवंट, धर्मा जावळे, पंकज शिंदे, अशोक मुरडनर , विजयराव ताजणे ,नंदू निकम ,विठ्ठल निकम तालुक्यातील वंचित लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते