कोपरगाव नागपूर- मुंबई महामार्ग: उभ्या मालट्रकला झायलो गाडी धडकली; एक ठार, एक जखमी,
Kopargaon Nagpur-Mumbai highway: Vertical freight truck hit; One killed, one wounded,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9Fab2022 17.30Pm.
कोपरगाव: नागपूर-मुंबई महामार्गावर कातकडे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला झायलो गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात झायलो कार मधील एक जण ठार झाला, तर झायलो चालक जखमी झाला आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (९) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास टायर फुटल्याने मालट्रक क्रमांक एम. एच. १८ बीजी. ५४४३ हा रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान नागपूरकडून संवत्सर कडून पुणतांबा फाटयाकडे भरधाव वेगाने जात असताना झायलो क्रमांक एम. एच. ०४ डीवाय. ९६११ या मालट्रकला जोराची धडक दिली या झालेल्या अपघातात झायलो कारमधील बाबासाहेब कचरू वाहुले (३७) राहणार नालंदानगर, घाटकोपर, ईस्ट मुंबई हे जागीच ठार झाले, तर झायलो चालक सलीम चांद शेख (३५) रा. नालंदानगर, घाटकोपर, ईस्ट मुंबई हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मालट्रक मालक आनंद राजेश त्रिभुवन (३२) रा.नक्षत्रवाडी औरंगाबाद, यांनी कोपरगाव शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून झायलो चालक याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहिदास ठोंबरे हे पुढील तपास करीत आहेत.





