कोपरगाव तालुका शासकीय समित्यांवर शिवसेनेच्या ११ जणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

कोपरगाव तालुका शासकीय समित्यांवर शिवसेनेच्या ११ जणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

Appointment of 11 Shiv Sena members as non-official members on Kopargaon taluka government committees

शिवाजी ठाकरे,असलम शेख, सपना मोरे, राखी विसपुते यांचा समावेश Shivaji Thackeray, Aslam Sheikh, Sapna More, Rakhi Vispute

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu10Fab2022 20.00Pm.

कोपरगाव :राज्यात शिवसेना, कॉंग्रेस राष्टवादी कॉंग्रेस असे तिघांचे सरकार आहे. दोन सव्वा दोन वर्षाचा कार्यकाळ उलटल्यानंतर शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तालुक्यातील शासकीय समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. यात तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, विधानसभा संघटक असलम शेख, महिला उपजिल्हाप्रमुख सपना मोरे महिला राखी विसपुते यांचा समावेश आहे.

कोपरगाव तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार ७ समितीवरील ५० सदस्यांपैकी शिवसेनेच्या वाट्याला केवळ ११ सदस्यांची निवड करण्यात आली.

यात आत्मा समिती शेतकरी गट प्रवर्गातून शिवाजी मुरलीधर ठाकरे,तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठित करणे लोक विश्वास संपादित प्रतिष्ठित व्यक्ती महिला प्रवर्गातून सौ. सपना भरत मोरे, तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती विरोधी पक्ष प्रतिनिधी प्रवर्गातून असलम गफुर शेख, व वैशाली गणेश दरेकर,(महिला),नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती विरोधी पक्ष प्रतिनिधी प्रवर्गातून दिलीप माधवराव आरगडे, संजय गांधी निराधार योजना समिती, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून बाळासाहेब पिराजी साळुंखे,व धर्मा शिवराम जावळे( ज्येष्ठ नागरिक), तालुका स्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समिती महिला प्रवर्गातून सौ. राखी मनोज विसपुते,व अनुसूचित जाती प्रवर्गातून नवनाथ शुकलेश्वर आहेर,रोजगार हमी समिती बिगर मागासवर्गीय प्रवर्गातून अशोक सुखदेव कानडे व महिला प्रवर्गातून सौ. अश्विनी संतोष होने या ११ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या कार्यकर्त्याना खुश करून व त्यांच्या माध्यमातून पक्षसंघटन मजबूत व्हावे त्याच बरोबर सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क होऊन त्यांच्याशी जवळकी साधता यावी यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर विविध विभागात विविध समित्या स्थापन केल्या जातात व या समितीत अशासकीय सदस्य पदी आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येते परंतु सरकार बद्दलताच ह्या समिती आपोआपच बरखास्त होतात. पूर्वीचे भाजप सेना युतीचे सरकार जाऊन आता शिवसेना कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसचे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत येऊन दोन अडीच वर्ष झाल्यानंतर या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. अजूनही काही समित्या समित्यांवरील नियुक्त्या घोषित होणार आहेत यासाठी कार्यकर्ते प्रतीक्षेत आहेत

Leave a Reply

You cannot copy content of this page