आधुनिक ज्ञानाचे धडे घेणारे संजीवनी कॅडेटस् कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील – ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे
Sanjeevani Cadets who take lessons in modern knowledge will succeed in any field – Group Captain Ujwal Ghormade
ग्रुप कॅप्टन घोरमाडेंची संजीवनी सैनिकीला भेटGroup Captain Ghormade visits Sanjeevani Sainiki
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir11Fab2022 19.20Pm.
कोपरगांव: संजीवनी सैनिकी स्कूल संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची तरूणांना सैनिकी प्रशिक्षण देण्याची दूरदृष्टीता वाखाणन्याजोगी आहे. येथिल शिस्त आणि आधुनिक ज्ञानाचे धडे घेणारे कॅडेटस् कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील, असे गौरवोद्गार सैनिक स्कूल, साताराचे प्राचार्य व इंडियन एअर फोर्सचे ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे यांनी संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेज भेटीत व्यक्त केले. कॅडेटसने उत्कृष्ट संचलन करून गार्ड ऑफ ऑनर दिला.
या प्रसंगी संजीवनी ग्रुपचे विश्वस्त सुमित कोल्हे, प्राचार्य डाॅ. जी.बी. गायकवाड, उपप्राचार्य के. एल. दरेकर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
ग्रुप कॅप्टन घोरमाडे पुढे म्हणाले की, शैक्षणिक , मानसिक, शारीरिक दृष्ट्या सक्षम पिढी तयार करण्याच्या उद्देशाने सातारा येथे १९६१ साली सुरू झालेली ३३ शाळांमधिल पहिली सैनिक शाळा आहे. संजीवनी सैनिकी स्कूल पॅटर्नमुळे येथील कॅडेट्समध्ये सुध्दा आत्मविश्वास , आत्मनिर्भरता, सामावुन घेणारा स्वभाव, उच्च आदर आणि इतरांच्या विचारांचा आदर, धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन , अशा पैलुंची रूजवण होत आहे. निरोगी शरीरात सुदृढ मन असल्यामुहे ते जीवनीच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील.
ग्रुप कॅप्टन घोरमाडे यांनी येथील वसतिगृह व तेथिल सुविधा, अटल टिंकरींग लॅब, खेळाची विस्तृत मैदाने, जलतरण तलाव, भव्य जिम्नॅशिअम हाॅल, इत्याइी बाबींचीही वाहवा केली व भविष्यात आवश्यक ती मदत करण्याची भावना व्यक्त केली.





