आ. राधाकृष्ण विखेकडुन २५० एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किट्सचे वाटप
Come on. Distribution of grocery kits to 250 ST employees from Radhakrishna Vikhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir11Fab2022 19.30Pm.
कोपरगाव : राज्य परिवहनचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या साडेतीन महिन्यांपासून एसटी कामगारांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठबळ म्हणून माजी मंत्री मा राधाकृष्ण विखे यांनी कोपरगांव आगारातील सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत किराणा सामान किट्स वाटप केले.
संपूर्ण राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी गेल्या साडेतीन महिन्यांहून अधिक काळापासून दुखवटा आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या तसेच सेवा समाप्तीच्या कारवाया शासनाकडून करण्यात आल्या आहेत. या आंदोलक कर्मचान्यांचे वेतनही बंद आहे. परिणामी कर्मचारी आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. उपासमारीची वेळ या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. असे असतानाही हे कर्मचारी न्याय मिळेपर्यंत आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांचे आंदोलन सुरुच आहे. अहमदनगर जिल्हयातील कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली असून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा म्हणून किराणा किटस् वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपाचे विकास आढाव यांनी सरकार किराणा दुकानातून मद्य विक्रीचा निर्णय घेऊ शकते मग एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार का केला जात नाही ? अशी जोरदार टीका त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर केली.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याने त्यावर राज्य सरकारने तातडीने तोडगा काढून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आ. राधाकृष्ण विखे , खासदार डॉ. सुजय विखे , गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे , ज्येष्ठ नेते राजेंद्रबापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहू असेही श्री आढाव यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे विकास आढाव यांच्यासह गोदावरी दूध संघाचे उपाध्यक्ष संजय खांडेकर मनिष शहा, अजित कोरके, सचिन अजमेरे, औद्योगिक वसाहन सोसायटीचे संचालक सोमनाथ निरगुडे, राहूल आढाव, रवींद्र आढाव, दगू गुडघे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते व संपकरी कर्मचारी उपस्थित होते.