नगरपालिका कर वसुलीतून शहरवासीयांना मूलभूत सुविधा पुरविते- मुख्याधिकारी गोसावी

नगरपालिका कर वसुलीतून शहरवासीयांना मूलभूत सुविधा पुरविते- मुख्याधिकारी गोसावी

Municipalities provide basic facilities to the city dwellers through tax collection- Chief Officer Gosavi

घरपट्टी नळपट्टी भरण्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

कोपरगाव: नगरपालिकेच्या मालमत्ता कर, पाणी पट्टी, व्यवसायिक व इतर आस्थापनेवर आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक कर वसुल रक्कम शहरांमधील सोईसुविधासाठी उपयोग केला जातो.यातुन शहरातील नागरिकांना विद्युत, स्वच्छता, रस्ते बांधकाम, पाणी व इतर मूलभूत सुविधा प्रशासन पुरविते अशी माहिती कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.घरपट्टी नळपट्टी भरण्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना मुख्याधिकारी तथा प्रशासन गोसावी म्हणाले, कोपरगाव शहरांमधील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी, व्यवसायिक गाळा धारकाची कर वसुलीची मोहीम खूप यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. सर्व पथक नियुक्त केलेल्या विविध भागांमध्ये नागरिक व व्यावसायिक यांच्या कडे जाऊन कर जमा करण्यासंदर्भात आव्हान व विनंती करत आहेत या विनंतीला कोपरगावचे नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच कर बाकी असलेल्या नागरिकांनी आपल्या कडील येणे बाकी कर रक्कम विहित वेळेत भरावी कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू नये. व प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन श्री. गोसावी यांनी शेवटी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page