कोळपेवाडी,पोहेगाव,चास नळी शहा सबस्टेशनला तातडीने जोडणार – मंत्री प्राजक्त तनपुरे
Kolpewadi, Pohegaon, Chas Nali will be connected to Shah substation immediately – Minister Prajakt Tanpure
कोपरगावचा सबस्टेशनचा भार होणार कमी- ना. आशुतोष काळेKopargaon substation load will be less- no. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir11Fab2022 19.40Pm.
कोपरगाव :तालुक्याच्या पश्चिमकडील कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला तातडीने जोडण्याची ग्वाही उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. तर यामुळे कोपरगावचा सबस्टेशनचा भार होणार कमी असल्याचे श्री साई संस्थान अध्यक्ष मटका ना. आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर मतदार संघातील वीज प्रश्नावर महावितरण व महापारेषणच्या सबंधित आढावा बैठकीत सांगितले.
यावेळी ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विजेच्या समस्या उपस्थित करून कोपरगाव शहरातील सबस्टेशनवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे ऊर्जा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांनी शहा येथील १३२ के. व्ही. सबस्टेशन वरून कोळपेवाडी, पोहेगाव, चास नळी या सबस्टेशनला जोडण्यासाठी ४८.०६ किलोमीटर वीजवाहिनी टाकण्याची निविदा प्रसिद्ध झाली असून अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. तसेच धामोरी व चांदेकसारे येथील सबस्टेशन ए. सी. एफ. योजनेंतर्गत बसविणे. मतदार संघातील ओव्हरलोड ट्रान्सफार्मरचे प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे दाखल केलेले आहेत त्यांना मंजुरी मिळावी. वारी आणि रवंदे सबस्टेशनची क्षमता वाढवावी. वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने ट्रान्सफार्मर मिळावे. नादुरुस्त ट्रान्सफार्मर वेळेवर मिळावे. कोपरगाव शहरात वीजवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात अडचणी येत असल्यामुळे शहरातील वीजवाहिन्या स्थलांतरीत कराव्या अशा अनेक मागण्या ना. काळे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे या आढावा बैठकीत केल्या. त्याबाबत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देतांना कोकमठाण, शिंगवे आणि खिर्डी गणेश या सबस्टेशनला ५ एम. व्ही. ए.चे पॉवर ट्रान्सफार्मर बसविणार, सबस्टेशनवर कोपरगाव तालुक्याच्या मागणीनुसार सबस्टेशनची निर्मिती करा व भविष्यातील गरज ओळखून अतिरिक्त सबस्टेशन उभारा. वीजग्राहकांना चांगली सेवा द्या. कामचुकार कर्मचा-यावर कारवाई करा. विजेच्या प्रश्नाबाबत माझ्याकडे तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या. कोळशाच्या टंचाईमुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा १० तासावरून आठ तास करण्यात आला होता त्याबाबत माहिती घेवून पुन्हा कृषी पंपासाठी १० तास वीजपुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक ज्ञानदेव मांजरे, सचिन रोहमारे, सुनील शिंदे, हरीभाऊ शिंदे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, राजेंद्र मेहेरखांब, मिननाथ बारगळ, आनंदराव चव्हाण, विठ्ठलराव आसने, सर्जेराव कोकाटे, अशोकराव काळे, काकासाहेब जावळे, बाबासाहेब कोते, डॉ. पवार राधु कोळपे, गोरक्षनाथ जामदार, राजेंद्र जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, माधवराव खिलारी, शिवाजी ठाकरे, सुनील गंगूले, चारुदत्त सिनगर, कलविंदरसिंग डडियाल, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, मधुकर टेके, अनिल कदम, श्रावण आसने, सुधाकर होन, राहुल जगधने, फकीर कुरेशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकरी अभियंता भूषण आचारी, डी.डी. पाटील, भगवंत खराटे आदींसह कोपरगाव मतदार संघातील सर्व सहाय्यक अभियंता व शेतकरी उपस्थित होते.
चौकट :- शहा येथील १३२ के.व्ही. सबस्टेशनला जोडण्यामुळे कोपरगाव शहर १३२ के.व्ही. सबस्टेशनवरील अतिरिक्त भार कमी होणार तसेच रोहीत्रांची संख्या देखील वाढणार यामुळे विजेच्या बहुतांश समस्या सुटणार आहे. – ना. आशुतोष काळे.