पादचारी मोरे कुटुंबास कारची धडक चार वर्षाच्या कार्तिकचा मृत्यू

पादचारी मोरे कुटुंबास कारची धडक चार वर्षाच्या कार्तिकचा मृत्यू

Four-year-old Kartik dies in car crash

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir11Fab2022 19.50Pm.

कोपरगाव : तालुक्यातील तळेगाव मळे गावानजीक मुंबई – नागपूर महामार्ग वर आई वडिलांसह पायी जाणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्याला पाठीमागून कारने दिलेल्या धडकेत आई वडील जखमी झाले असून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी तालुक्यातील तळेगाव मळे येथील प्रकाश पांडुरंग मोरे (३०) हे बुधवारी ९ रोजी दुपारी चारच्या सुमारास तळेगाव मळे शिवारात मुंबई नागरपूर महामार्गावरून रमेश शिवाजी क्षिरसागर यांचे शेताचे जवळ त्याची पत्नी रेनुका प्रकाश मोरे (२) या चार वर्षीय मुलगा कार्तिक प्रकाश मोरे पायी जात असताना एम . एच . २० ई . ई .४१८० कारच्या अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून अविचाराने भरधाव वेगात गाडी कोपरगाव कडुन वैजापुरकडे चालवित असताना प्रकाश पांडुरंग मोरे यांना व त्याच्या पत्नी व मुलास पाठीमागून जोराची धडक दिली, या घटनेत प्रकाश पांडुरंग मोरे व पत्नी रेनुका प्रकाश मोरे हे जखमी झाले, या दुर्घटनेत चार वर्षीय त्यांचा मुलगा कार्तिक हा मयत झाला आहे.

या घटनेतील जखमी पती-पत्नींना व मुलास प्रथम आधार हॉस्पिटल वैजापूर व अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल केले होते.सदर प्रकरणी प्रकाश पांडुरंग मोरे यांनी गुरुवारी १० रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून तालुका पोलिसांनी एम . एच . २० ई . ई .४१८० काळ्या रंगाच्या कारच्या अज्ञात चालका विरोधात भादवी कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढिल तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक गवसने हे करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page