कोपरगाव तहसिलच्या निवडणुक शाखेत आमदाराच्या पीएचा हस्तक्षेप – रोहोम

कोपरगाव तहसिलच्या निवडणुक शाखेत आमदाराच्या पीएचा हस्तक्षेप – रोहोम

Interference of MLA’s PA in the election branch of Kopargaon tehsil – Rohom

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun13 Fab2022 17:30Pm.

कोपरगाव :आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना नव्याने होत आहे. मुंबई येथे सर्व कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.मात्र कोपरगाव तहसिलच्या निवडणुक शाखेत आमदाराचे पीए. स्वतःच्या खाजगी कार्यालयाप्रमाणे येथील संगणक हाताळत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचा आरोप कोपरगाव भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

अशा मन मर्जी पद्धतीने हस्तक्षेप करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे पाप सत्तेचा वापर करून सुरू आहे.आपल्या मर्जीप्रमाणे गावे वेगवेगळ्या गटात घालण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून राजकीय सोयीचे सर्व काही दस्त बनवून घेत गट व गण रचनेत हेराफेरी करत आहेत का असा संशय देखील रोहोम यांनी व्यक्त केला आहे. हा निंदनिय प्रकार आहे.

एकीकडे जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा असतांना व तलाठयाकडून वरती अशी माहितीची प्रतवारी करावी असा संकेत असतांना त्यांच्यावर दबाव टाकून आराखडा बदलण्यास भाग पाडले जात तर नाही ना? ताबडतोब या संदर्भात कार्यवाही व्हावी व सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांना शासन व्हावे.

आमदार काळे यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणूकित झालेली धूळधाण त्यांना बोचत असल्याने व आगामी काळात होणाऱ्या पराभवाची चाहूल लागल्याने त्यांची पायाखालची जमीन सरकल्याने हा खटाटोप सुरू आहे असे साहेबराव रोहोम म्हणाले

Leave a Reply

You cannot copy content of this page