समन्यायीच पाप तुमचंच, दुसऱ्याच्या माथी मारू नका – सोमनाथ चांदगुडे

समन्यायीच पाप तुमचंच, दुसऱ्याच्या माथी मारू नका – सोमनाथ चांदगुडे

Equal sin is yours, don’t kill others – Somnath Chandgude

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun13 Fab2022 17:40Pm.

 कोपरगाव: समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा हा २००३ सालीच ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी सत्ताधारी आमदार या नात्याने विरोध केला असता तर समन्यायी पाणी वाटप कायदाच अस्तित्वात आला नसता. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच पाप हे तुमचंच आहे ते पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका असा सणसणीत टोला भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे यांनी कोल्हेंना लगावला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे अगोदरच तुटीच्या असलेल्या गोदावरी लाभक्षेत्रावर अन्याय होणार याची कल्पना त्यांना आली नाही का? असा सवाल सोमनाथ चांदगुडे यांनी विरोधकांना केला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा २००३ ला तयार केल्यानंतर २००५ ला समन्यायी पाणी वाटप कायदा अस्तित्वात आला त्यावेळी माजी आमदार अशोकराव काळे हे विरोधी पक्षाचे आमदार होते. मात्र मतदार संघातील जनतेविषयी खरी तळमळ असणाऱ्या माजी आमदार अशोकराव काळे यांनी सर्वप्रथम समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात याचिका माझ्याच नावावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करून आजही सर्वोच्च न्यायालयात ना. आशुतोष काळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात लढत आहेत हे देखील विरोधकांनी सांगितले पाहिजे त्यामुळे पूर्वेतिहास चाळण्याची खरी गरज विरोधकांना आहे.

पाणी प्रश्न हा काळे परिवारासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे १९८४ पासून गोदावरी कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे यांनी उभारलेला लढा आजही मा. आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. आशुतोष काळे न्यायालयीन लढाई लढत आहेत. टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने सगळ्यांना दिला आहे. त्यामुळे टीका करण्याची पात्रता तुम्ही कशाला तपासता. तुमच्यावर लोकशाहीच्या माध्यमातून केलेल्या टीकेचे उत्तर असेल तर द्या. उगाच बिनबुडाचे आरोप करू नका.

चौकट :- गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला हि विरोधकांची पोटदुखी आहे. -सोमनाथ चांदगुडे

Leave a Reply

You cannot copy content of this page