कोल्हेंवर टीका करण्यासाठी उसना खांदा घेण्याची गरज पडते हेच ना. काळेंचे अपयश – मनेश गाडे

कोल्हेंवर टीका करण्यासाठी उसना खांदा घेण्याची गरज पडते हेच ना. काळेंचे अपयश – मनेश गाडे

Isn’t it necessary to borrow a shoulder to criticize a kohle? Kale failure – Manesh Gade

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun13 Fab2022 18:00Pm.

कोपरगाव : कालवा फुटी मुळे कालवा दुरुस्तीचे बिंग उघडे पडले आहे याच प्रकारे आमदार काळे यांनी दोन वर्षे जनतेची दिशाभूल केल्याने त्यांना आज कोल्हे यांच्यावर टीका करण्यासाठी उसना खांदा घेण्याची गरज पडते हेच ना.काळे यांचे अपयश असल्याची टीका कोल्हे कारखान्याचे संचालक मनेश गाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

काळे यांच्यावर सातत्याने गरळ ओकणाऱ्या व काही महिन्यांपूर्वी कालवा सल्लागार समितीच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढून काळे यांना घरचा आहेर देणाऱ्या सोमनाथ चांदगुडे यांचे अचानकचे घुमजाव म्हणजे काही ना काही पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना सर्वच आलबेल असल्याचा साक्षात्कार झाला का ?असा सवाल गाडे यांनी केला.

समन्यायी पाणी वाटप कायदा शेतकरी व जनतेच्या हिताच्या आड येईल असा कायदा होऊ नये या साठी विरोध करायला हवा होता, मात्र त्यांना राष्ट्रवादीला विरोध करायचाच नव्हता हे स्पष्ट होते कारण भविष्यात त्यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा होता यासाठी त्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याला मूक संमती दर्शवली. समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करायचाच असता तर याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले असते. असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

कोपरगावच्या मानगुटीवर बसलेल्या अन्यायकारक कायद्याला रद्द करण्याचे काम इतरांकडे बोट न दाखवता विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी आगामी अधिवेशनात समन्यायी पाणी वाटप हा कायदा रद्द करण्याची प्रक्रिया करून घ्यावी कारण सरकार त्यांचे आहे,ते आता श्री साई संस्थानचे अध्यक्ष आहेत त्याचा वापर करून समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून घ्यावा. असे  आवाहन गाडे यांनी पत्रकातून केले आहे.

चौकट – माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पाणी प्रश्नासाठी खडा आंदोलन,रुम्हणे मोर्चा,वीज मीटर आंदोलन,पाट पाण्यासाठी लढा,असा स्वपक्षाशी संघर्ष केला. शंकरराव कोल्हे यांचा पाणी प्रश्न व कोपरगाव विकासात मोलाचा वाटा स्वर्गीय शंकरराव काळे यांनीही कधी नाकारला नव्हता या उलट पाणी प्रश्नावर दोन्ही जेष्ठ नेत्यांनी राजकारण विरहित सकारात्मक भूमिका ठेवली होती, हे नव्या नेतृत्वाने विसरून बोलू नये. – मनेश गाडे

Leave a Reply

You cannot copy content of this page