नगर-मनमाड महामार्गावर गतिरोधक बसवा – कैलास जाधव
Install speed bumps on Nagar-Manmad highway – Kailas Jadhav
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon14 Fab2022 18:30Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहराच्या जवळून नगर- मनमाड हा महामार्ग गेलेला आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशा मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कोपरगाव तालुका रिक्षा-टॅक्सी संघटना अध्यक्ष कैलास जाधव यांनी केली आहे.
कैलास जाधव यांनी म्हटले आहे की , नगर-मनमाड महार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते. रस्त्यावरील रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या पलीकडे जाणे अत्यंत जोखमीचे व धोकादायक झालेले आहे. याठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. त्यामुळे वाहनांच्या गतीवर ब्रेक लावण्यासाठी कोपरगाव शहरातील संजीवनी युवा प्रतिष्ठान चौक, येवला नाका, साई तपोभुमी चौक,शुक्लेश्वर बेट चौक, पुणतांबा फाटा या चार ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे.
दोन्ही बाजूकडून येणारी वाहने प्रचंड वेगाने येत असल्यामुळे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, सद्गुरू गंगागिरी कॉलेज, महिला कॉलेज, सहकार महर्षी कोल्हे साखर कारखाना, गोदावरी दुध संघ, रेल्वेस्टेशन, औद्योगिक वसाहत, के.जे.सोमय्या व के बी. रोहमारे कॉलेज, शुकलेश्वर कचेश्वर देवस्थान, संत जनार्दन स्वामी मंदिर, जुनी गंगा देवी मंदिर, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, कामगार नागरिक यांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यास धोका निर्माण झाला आहे.
सदरील रोड जागतिक बँकेच्या अखत्यारीत येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वरील सुचवलेल्या चार ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे. याबाबत योग्य ती कार्यवाही न झालेस रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही कैलास जाधव यांनी यावेळी दिला आहे .





