कोपरगाव तालुका मन्सूरी- पिंजारी समाज कार्यकारिणीची बैठक

कोपरगाव तालुका मन्सूरी- पिंजारी समाज कार्यकारिणीची बैठक

Meeting of Kopargaon Taluka Mansuri-Pinjari Social Executive

नवीन कार्यकारिणीची निवड Selection of a new executive

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue15 Fab2022 19:30Pm.

कोपरगाव : शहरातील आरसी कॉम्प्लेक्स सभागृहामध्ये समाजाचे ज्येष्ठ नेते मुन्ना मन्सुरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दि.१५ रोजी सकाळी ११ वाजता पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव हजर होते.

यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना मुन्ना मन्सुरी म्हणाले, आजपर्यंत एक मतदार म्हणून आपल्या समाजाच्या विखुरलेपणाचा फायदा घेतला गेला.मात्र समाजाला कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत न्याय मिळाला नाही. तेव्हा कार्यकारणी च्या माध्यमातून समाज बांधणी करण्यात येत आहे. आपल्या समाजाची एकजुट असेल तर आपल्या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत.त्या आपल्याला शासन दरबारी मांडता येतील या दृष्टीने आपली वाटचालाची सुरवात आहे. आपण अल्पसंख्यांक जरी असलो तरी आपण सर्वजण एक झालो तर आपली मोठी ताकद निर्माण होऊ शकते. हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

मुन्ना मन्सुरी पुढे म्हणाले, आज पर्यंत केवळ मतासाठी व राजकारणासाठी आपला व  आपल्या समाजाचा उपयोग झाला आहे. परंतु भविष्यात समाजाला येणाऱ्या अडचणी व मागण्या सोडविण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने सरकारची दरबारी लढा उभारावा लागणार आहे. त्यादृष्टीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज कार्यकारिणीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत.असे सांगीतले. समाज एकसंध व बळकट व्हावा समाजाच्या विकास व विस्तारासाठी सभासदत्व मोहिमेबाबत चर्चा केली. व समाजाचे ध्येय धोरण आणि काम याबद्दल मुन्ना मन्सुरी यांनी माहिती दिली.

त्यानंतर मुन्ना मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या संमतीने नवीन शहर व तालुका कार्यकारिणी  निवडण्यात आली,

कोअर कमिटी मध्ये

जाहिद उर्फ मुन्ना युसुफ मन्सुरी, सलीम दिलावर मन्सुरी, सलीम हुसेन मन्सुरी, शफिक अकबर मन्सुरी, शब्बिर सुभान मन्सुरी, शकील बाबू मन्सुरी, इसाक मन्सुरी, यांची निवड करण्यात आली आहे.

शहर व तालुका कार्यकारिणी

अयुब अकबर मन्सुरी (अध्यक्ष), करीम भिकन मन्सुरी (उपाध्यक्ष), नदीम रज्जाक मन्सुरी (सेक्रेटरी), फैज हबीब मन्सूरी (खजिनदार), तर

नियोजन समितीचे

मोहम्मद मन्सूरी (अध्यक्ष), कलीम पिंजारी, मोहसिन मन्सुरी, साजीद मन्सुरी, जुनेद मन्सुरी, अशपाक मन्सुरी, असलम मन्सूरी, राहिल मन्सूरी, अरबाज मन्सूरी, राजू मन्सूरी यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती मुन्ना मन्सुरी यांनी दिली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page