जेऊर कुंभारी पाणी योजनेसाठी ना. काळे यांचा पाठपुरावा – सौ. अनुसया होन
No. for Jeur Kumbhari water scheme. Pursuit of Kale – Mrs. Anusaya Hon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Fab2022 17:00Pm.
कोपरगाव : जेऊर कुंभारी पाणी पुरवठा योजनेस ९ कोटी ९२ लाख ३१ हजार रूपये निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केला असल्याची माहिती माजी सभापती सौ.अनुसया होन यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मागील पाच वर्षात अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांनी निवडून येताच या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना निधी मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबविल्याबद्दल जेऊर कुंभारीच्या ग्रामस्थांच्या वतीने सौ. होन यांनी ना. आशुतोष काळे आभार मानले आहे.