शिवरायांच्या विचाराची आज गरज-विवेक कोल्हे

शिवरायांच्या विचाराची आज गरज-विवेक कोल्हे

Shivaraya’s thoughts are needed today – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat18 Fab2022 18:00Pm.

कोपरगांव : छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होवुन गेले त्यांच्या विचारांची आज सर्वानाच गरज आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचे विवेक कोल्हे यांनी विधीवत पुजन केले.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना आई जिजाउंच्या शिकवणीला सर्वोच्च प्रधान्य दिले, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची दिशा आणि प्रजेचे कल्याण साधण्यासाठी त्यांनी नानाविध योजनांची आखणी करून त्या प्रत्यक्ष अंमलात आणल्या. त्यामुळे शिवाजी राजांचा इतिहास ३९२ वर्षे होवुनही आपल्यासमोर जीवंतपणे उभा आहे तो विचार समाजकारणांत सतत तेवत ठेवावा.           

याप्रसंगी योगेश बागुल, कैलास जाधव, रविंद्र पाठक, साहेबराव रोहोम, दत्ता काले, पराग संधान, विजय आढाव, केशव भवर, अरिफ कुरेशी, अविनाश पाठक, सागर जाधव, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, राजेंद्र सोनवणे, रविंद्र रोहमारे, जनार्दन कदम, वैभव गिरमे, दिनेश कांबळे, प्रदिप नवले, बाळासाहेब नरोडे, रिपाईचे दिपक गायकवाड, विवेक सोनवणे, दिपक जपे, गोपी गायकवाड, राहुल सुर्यवंशी यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page