सूर्यतेजचे कार्य नवोदितांना प्रेरणा देणारे – गोविंद शिंदे
Suryatej’s work inspires newcomers – Govind Shinde
आपेगांवच्या युवा परिवर्तन फाऊंडेशनचा ढाल, गौरवपत्र आणि आंबा रोप देवून सन्मानApegaon’s Yuva Parivartan Foundation honored with a shield, certificate and mango sapling
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat18 Fab2022 20:00Pm.
कोपरगांव: शिवजन्मोत्सव निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या शिवप्रेमी स्वयंसेवी संस्थांचा सूर्यतेज संस्थेकडुन होणारा सन्मानाचा उपक्रम कौतुकास्पद असून उत्सवाची परंपरा टिकवत नवोदितांना प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केले.
कोपरगांव च्या सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त तालुक्यातील शिवजयंती सार्वजनिक उत्सव संघटना, संस्था, मंडळे १९ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘विधायक उपक्रम स्पर्धेतील सहभागी संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वृक्षसंवर्धनाचे आज्ञापत्र व भारत सरकारचे आयुष मंत्रालय निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.श्री.शिवरत्न शेटे यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र आणि अंबावृक्षाचे रोप देवून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, दत्तोबा जगताप, महेंद्र पाटील, मंगेश पाटील, सुरेश पाटील, मंदार आढाव, बाळासाहेब आव्हाड, दिलीप घोडके, मकरंद जोशी, सेवासिंग सहाणी, रियाज शेख, विशाल झावरे, डॉ.योगेश कोठारी, सूर्यतेजचे सुशांत घोडके, शिवाजी जाधव (शिरसगांव), ग्रंथपाल योगेश कोळगे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत सहभागी युवा परिवर्तन फाऊंडेशन,आपेगांव (चित्रकला,निबंध, कबड्डी, डिजीटल अप, शिवव्याख्यान), सेवा फाऊंडेशन (रक्तदान शिबिर), कोपरगाव, ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था (वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम), ब्राम्हणगांव, बळीराजा पार्टी (सामाजिक उपक्रम), कोपरगाव,साई निवारा मित्र मंडळ (जंतूनाशक फवारणी यंत्र लोकार्पण), कोपरगाव, शिवभक्त प्रतिष्ठान (मुकबधीर विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप),सेवा प्रतिष्ठान (वृद्धाश्रमात भोजन व उपयोगी साहित्य वाटप), कोपरगाव, ग्रामस्थ शिरसगांव (शालेय साहित्य वाटप),शिवजागर एक विचारधारा फाउंडेशन, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती, कोपरगाव यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत सुशांत घोडके यांनी तर सूत्रसंचालन व आभार मंगेश भिडे यांनी केले.
चौकट
शिवजयंती उत्सव २०२२ निमित्त सूर्यतेज संस्थेच्या वतीने विधायक उपक्रम स्पर्धा आयोजित केली आहे.तरी शिवप्रेमींनी प्रशासनाने नियम पाळून विधायक उपक्रम स्पर्धेत सहभागी व्हावे.असे आवाहन सुशांत घोडके यांनी केले आहे.