शिंगणापुरच्या शिवकमानीचे विवेक कोल्हेच्या हस्ते लोकार्पण
Dedication of Shivkamani of Shinganapur by Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun20 Fab2022 17:00Pm.
कोपरगांव : तालुक्यातील शिंगणापुर येथे लोकसहभागातून ५० हजार रुपये वर्गणी गोळा करून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे लोकार्पण शिवजयंतीचे औचित्य साधुन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता संवत्सरकर होत्या.
प्रारंभी भिमा संवत्सरकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सर्वश्री अंकुश कुऱ्हे , शेखर कुऱ्हे, दिनकर गीते, दिगंबर कुऱ्हे, पंकज कुऱ्हे, किरण धोकर, किरण कुऱ्हे, योगेश आजगे, योगेश जाधव, अदिनाथ लगड, शिवा आजगे, गणेश आढाव, राहूल आढाव, विशाल कुऱ्हे, राजेंद्र चव्हाण, अक्षय शिल्लक, विनोद कुऱ्हे, दिपक कुऱ्हे, समाधान कुऱ्हे, विलास घोडेराव, विलास आजगे, बाळासाहेब संवत्सरकर, गणेश महाजन, रुपेश आजगे, रवि ठाकरे, विजय जाधव यांच्यासह असंख्या शिवप्रेमी उपस्थित होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, शिंगणापुर रहिवासीयांनी मनाचा मोठेपणा दाखवत रयतेचा कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची सर्वांना आठवण व्हावी म्हणून त्यांच्या नावाने प्रवेशद्वार तयार केले, ही बाब इतरांना स्फुर्ती देणारी आहे. युवकांनी छत्रपतींच्या विचारांचा वारसा सातत्याने पुढे न्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले, शेवटी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांनी आभार मानले.