छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे गुरवारी पोहेगांवात आगमन- नितीन औताडे
Chhatrapati’s equestrian statue arrives in Pohegaon on Thursday – Nitin Autade
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी महाराज अश्वारूढ स्मारकाचे अनावरण करणारChief Minister Uddhav Thackeray will unveil the Shivaji Maharaj Equestrian Memorial
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun20 Fab2022 17:20Pm.
कोपरगाव: पोहेगांव येथे गुरुवारी आणण्यात येणार आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व पोहेगाव ग्रामस्थ गुरुवारी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे माहिती राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे मार्गदर्शक शिवसेनेचे नितीन औताडे यांनी पोहेगाव येथे शिवजयंती कार्यक्रमात बोलतांना दिली.
पोहेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शासकीय मान्यता मिळाल्याने खा. सदाशिव लोखंडे व ना. शंकरराव गडाख यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. असेही नितीन औताडे यांनी सांगीतले.
यावेळी सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रामविकास अधिकारी बरबडे भाऊसाहेब,राजेंद्र कोल्हे, दादासाहेब औताडे, ऋत्विक औताडे, योगेश औताडे , ग्रा.प.सदस्य निखील औताडे, नंदकिशोर औताडे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, शिवस्मारक समितीचे ज्ञानेश्वर औताडे, अंकित औताडे, अमोल जाधव, संदिप औताडे, अशोक औताडे, प्रकाश मोकळ, ठोंबरे गुरुजी, भाऊसाहेब वाघ, अशोक औताडे, बाबुराव वाघ, अंकुश अवचर, सुरेश शिंदे, नवनाथ औताडे, योगेश गिते, ज्ञानेश्वर बोरकर, प्रशांत आनप, अमोल औताडे, गणेश गायकवाड, यशोधन औताडे, अनिल गायकवाड, राहुल औताडे, किशोर गायकवाड आदींसह शिवप्रेमी ग्रामस्थ, स्मारक समिती सदस्य व कर्मचारी वृंद मोठे संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वरांजली उदावंत हिने शिव पोवाडा तर शिवचरित्र व्याख्याते सुरज तुवर यांनी शिवचरित्रावर शिव व्याख्यान दिले. गुरवारी (२४) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ स्मारकाचे आगमन कोपरगाव तालुक्याच्या शिवेपासून भव्य मोटरसायकल रॅलीने होणार आहे. पोहेगांवच्या शिवहद्दीपासुन भजनी मंडळ टाळ मृदंगाच्या गजरात, लेझीम पथक लेझीम खेळुन ढोल-ताशांच्या गजरात महाराजांच्या स्वागताची भव्य मिरवणूक गावात काढण्यात येणार आहे.
स्मारकाचे अनावरण करणेकामी नितीन औताडे यांनी २१ हजार, राजमुद्रा ग्रुप ११ हजार, हिंदुत्व ग्रुप ११ हजार, नंदकिशोर औताडे ११ हजार, अंकुश क्रिएशन फोटो स्टुडीओ पोहेगाव, ५०००/-, भाऊसाहेब वाघ २१००/-, बाबुराव वाघ ११००/- प्रकाश मोकळ ११००/-, नवनाथ औताडे २१००/- यांनी रोख स्वरूपात देणगी शिव स्मारक समितीकडे सुपूर्द केली. सुनिल पवार यांनी मिरवणुकीकामी लागणारे डीजे व स्मारकाभौवती रोषणाई करण्याचा खर्च उचलला.सूत्रसंचालन श्री झावरे यांनी केले तर आभार सरपंच अमोल औताडे यांनी मानले.