ठराव झाला आहे , दारणा व निळवंडे या दोन्ही धरणांचे पाणी आरक्षण ठेवा, वाद नको – विजय वहाडणे
Resolution has been made, water reservation of both Darna and Nilwande dams, no dispute – Vijay Vahadne
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun20 Fab2022 17:30Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या व नव्याने पालिका हद्दीत समावेश झालेला ग्रामीण भाग आसपास असलेल्या शहरालगत असलेल्या हद्दीबाहेरील नगरांना द्यावे लागणारी पिण्याचे पाणी याचा विचार करता लोकांना फक्त शुद्ध स्वच्छ नियमित पाणी हवे आहे तेव्हा दारणा व निळवंडे या दोन्ही धरणांचे पाणी आरक्षण ठेवा, वाद नको असा सबुरीचा सल्ला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे की,अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही.त्यासाठी कोण जबाबदार आहेत,हा विषय अतिशय वादग्रस्त आहे.एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ नयेत म्हणूनच मी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत कोपरगावसाठी दारणा व निळवंडे या दोन्ही धरणांतून असलेले पाणी आरक्षण अबाधित ठेवावे असा विषय मांडला व तसा ठरावही सर्वानुमते करण्यात आला. कारण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळासाठीही पाणी साठवण वाढविणे महत्वाचे आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंका नाही.निळवंडे पाणी योजना पुर्णत्वास गेल्यानंतर मिळणारे पाणी साठवण करण्यासाठी साठवण क्षमता तयार असणेही गरजेचे आहे.पाणी कुठूनही आले तरी ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करूनच पाणी पुरवठा केला जातो. म्हणूनच पाच नंबर साठवण तलाव आणि नियोजित निळवंडे पाणी योजना पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. कोपरगावच्या नागरिकांचे कुठल्याही आरोप प्रत्यारोप, राजकारण यापेक्षा पाणी समस्येवर तातडीने उपाय करणे यावरच लक्ष आहे. आरोप- प्रत्यारोप यामुळे जनमत विचलित होऊ शकते याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे. पाणी कुठूनही येऊ द्या पण आम्हाला नियमित पाणी द्या हीच जनतेची अपेक्षा आहे. यांनी शेवटी म्हटले आहे





