कोपरगाव नगरपालिका छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Kopargaon is a municipality. Shivaji Maharaj Jayanti celebrated with enthusiasm
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun20 Fab2022 17:40Pm.
कोपरगाव : नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेक करण्यात आला .
सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी, सफाई मित्र, शिक्षक अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक, पूजन, आरती विधीवत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमा प्रसंगी पहाटे वातावरण शिवमय झालेले होते. नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, जेष्ठ विधिज्ञ जयंत जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, यासह उपमुख्याधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी, नगरपरिषदेच्या माध्यमिक, प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपण व्यवस्था, या वेळी मुख्याधिकारी यांच्या संकल्पने सर्वांसाठी विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या संरक्षण भिंतीकाठी विविध गड किल्ले यांची माहिती फलक तसेच स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीचे काही संदेश फलक ठरले.






