शिव आणि हरी एकच – विवेक कोल्हे.

शिव आणि हरी एकच – विवेक कोल्हे.

Shiva and Hari are one and the same – Vivek Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun20 Fab2022 17:50Pm.

कोपरगांव : तीर्थक्षेत्र पुणतांबा येथील चांगदेव महाराजांनी नरहरी सोनार यांचे नामकरण केले, गहीनीनाथ हे त्यांचे गुरु होते. संत नरहरी महाराजांची कट्टर शिवभक्ती होती मात्र त्यांना पंढरपुरच्या विठूरायाने शिव आणि हरी एकच असल्याची प्रचिती करून दिली असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

 शहराच्या सराफ बाजार भागातील मंदिरात शनिवारी संत नरहरी महाराज यांची ७३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यांत आली याप्रसंगी ते बोलत होते. 
         
 प्रारंभी सेनेचे गटनेते योगेश बागुल यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रकाश भडकवाडे, अरुण बागुल, विलास भडकवाडे, अनिल जाधव, कृष्णा उदावंत, तुलसीदास खुबानी, नंदकुमार विसपुते, तुळशीदास बागुल, अंबालाल पोरवाल, पराग संधान, साहेबराव रोहोम, राजेंद्र सोनवणे, विवेक सोनवणे, राजेन्द्र मंडलिक, अरीफ कुरेशी, अल्ताफ कुरेशी, अविनाथ पाठक, राहुल सुर्यवंशी, विजय आढाव, दिपक जपे, जनार्दन कदम, वैभव गिरमे, दिनेश कांबळे, रवि रोहमारे, यांच्यासह सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
         
  विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, संत नरहरी महाराज, हे उत्तम सुवर्ण कारीगिरी करणारे होते. त्यांचे आडनांव महामुनी होते. वडील शिवभक्त असल्याने ते ही शिवभक्त बनले. शेवटी प्रकाश भडकवाडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page