साईदेवा प्रतिष्ठानची शिवजयंती सर्वानाच उदबोधक-विवेक कोल्हे

साईदेवा प्रतिष्ठानची शिवजयंती सर्वानाच उदबोधक-विवेक कोल्हे

Saideva Pratishthan’s Shiva Jayanti is an enlightening one for all

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun20 Fab2022 18:00Pm. 

कोपरगांव : शहरातील साईदेवा प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो त्यांची शिवजयंती सर्वांनाच उदबोधक असते असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी  साईदेवा प्रतिष्ठानच्या शिवजयंती कार्यक्रमात केले

प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी प्रास्तविकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. याप्रसंगी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, विजय आढाव, पराग संधान, देवाग्रुपचे सर्व सदस्य पदाधिकारी संदिप सोनवणे, आकाश वाजे, विजय भगत, साईनाथ त्रिभुवन, दिपक नाईकवाडे, दिपक लोखंडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
           
 विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक कार्याचा इतिहास जीवंत असुन त्यांचे सर्व निर्णय लोकहितकारी आणि प्रेरणादायी आहेत. तरूण पिढीने हा इतिहास समोर ठेवून आपल्या जीवनातील ध्येय साध्य करावे. शेवटी आकाश वाजे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page